शौचालय बांधकामांचे ७५०० उद्दिष्ट
By Admin | Updated: February 27, 2016 00:14 IST2016-02-27T00:10:06+5:302016-02-27T00:14:56+5:30
कळमनुरी : चालू वर्षात स्वच्छ भारत अभियानांतर्गत तालुक्याला शौचालय बांधकामाचे ७५०० चे उद्दिष्ट देण्यात आले असल्याची माहिती विस्तार अधिकारी एस. टी. खंदारे यांनी दिली.

शौचालय बांधकामांचे ७५०० उद्दिष्ट
कळमनुरी : चालू वर्षात स्वच्छ भारत अभियानांतर्गत तालुक्याला शौचालय बांधकामाचे ७५०० चे उद्दिष्ट देण्यात आले असल्याची माहिती विस्तार अधिकारी एस. टी. खंदारे यांनी दिली.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत वार्षिक कृती आराखडा २०१६- १७ या वर्षात ग्रामपंचायत निवडीची प्रक्रिया राबविण्यासाठी पं. स. च्या सभागृहात सरपंच व ग्रामसेवकांची बैठक झाली. पं. स. सभापती महानंदा लोणे, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रकाश जोंधळे, एस. टी. खंदारे, मंगला कुबडे, साहेबराव बळवंते, राजेंद्र सरकटे आदी उपस्थित होते. २०१६-१७ या वर्षात नदीकाठची गावे, तीर्थक्षेत्राची गावे, बाजारपेठेची गावे, नळयोजना मंजूर असलेली गावे, या गावातील २०१२ च्या पायाभूत सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार प्राधान्यक्रम ठरवून जि.प. व पं.स. सदस्यांच्या शिफारशीने गावे निवडून नागरिकांस वैयक्तिक शौचालयासाठी बारा हजाराचे अनुदान वितरीत केले जाणार आहे. वार्षिक कृती आराखड्यात सहभाग घ्यावयाचा आहे, त्या ग्रामपंचायतींनी आपले प्रस्ताव २८ फेब्रुवारीपर्यंत पं.स. कडे सादर करावेत. २०१५-१६ या वर्षात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या १०० टक्के गाव पाणंदमुक्त करणाऱ्या किल्लेवडगाव, पेठवडगाव, कोंढूर, पुयना, फुटाणा या गावातील सरपंच व ग्रामसेवकांचा सत्कार करण्यात आला. प्रमोद मोहीते, संतोष भोजे, सतीश चव्हाण, शेख, शैनोद्दीन, आर.जी. श्रावणे, आर.डी. कुलकर्णी आदींनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)