७५ बंधाऱ्यांना कामांची प्रतीक्षा!

By Admin | Updated: April 11, 2017 00:15 IST2017-04-11T00:14:29+5:302017-04-11T00:15:30+5:30

जालना : जलयुक्त शिवार योजनेंतर्गत नदी पुनरूज्जीवन करण्यात येत असून, २०१५-१६ मध्ये २०९ पैकी फक्त ९१ बंधाऱ्यांची कामे पूर्ण झाली तरी अद्याप ७५ कामांना सुरूवातच होऊ शकली नसल्याचे समोर आले आहे

75 bunk wait for work! | ७५ बंधाऱ्यांना कामांची प्रतीक्षा!

७५ बंधाऱ्यांना कामांची प्रतीक्षा!

जालना : जलयुक्त शिवार योजनेंतर्गत नदी पुनरूज्जीवन करण्यात येत असून, २०१५-१६ मध्ये २०९ पैकी फक्त ९१ बंधाऱ्यांची कामे पूर्ण झाली तरी अद्याप ७५ कामांना सुरूवातच होऊ शकली नसल्याचे समोर आले आहे.
जलयुक्त शिवार योजनंतर्गत नद्यांच्या पुनरूज्जीवन माध्यमातून नद्यांवर सिमेंट साखळी बंधारे बांधले जात आहेत. या बंधाऱ्यांमुळे पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवून भूजल पातळी वाढावी हा त्यामागचा उद्देश. यात प्रामुख्याने नद्यांचे खोलीकरण तसेच अन्य कामे केली जात आहेत. पुनरूज्जीवन कामांमुळे गाव परिसरातील भूजल पातळीत वाढ होण्यासोबतच हजारो एकर जमीन सिंचनाखाली आल्याचे चित्र आहे. २०९ साखळी बंधाऱ्यांपैकी ७५ कामे सुरूच न झाल्याने त्या त्या गावातील शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. जलयुक्त कामांमध्येच नदी पुनरूज्जीवनची कामे असून यासाठी आठ तालुक्यांसाठी ५५ कोटी ३६ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. जालना तालुक्यात ९ गावांत मंजुरी मिळाली आहे. ११ साखळी बंधारे पूर्ण झाले असून, २ कामे प्रगतीपथावर आहेत. बदनापूर तालुक्यात ७ कोटी ५६ लाखांचा मंजूर झाला असून, १० गावांत ३४ बंधारे होणार आहेत. तर १२ कामे पूर्ण झाली आहेत. भोकरदन तालुक्यात १३ कोटी ९८ लाखांचा निधी मंजूर असून, २० गावांत ३३ सिमेंट साखळी बंधारे होत आहेत. १२ कामे पूर्ण झाली आहेत. यातून ८० सघमी एवढा पाणीसाठा झाला आहे. जाफराबाद तालुक्यात १२. ४१ कोटींचा निधी मंजूर झाला असून, १४ गावांत २८ बंधारे होणार असून, पैकी ८ कामे पूर्ण झाली आहेत. ३ कामे प्रगतीपथावर आहेत. परतूर तालुक्यात ८ कोटी ८० लाखांचा निधी मंजूर झाला आहे.
१३ गावांमध्ये ५४ बंधारे होणार असून ३६ कामे पूर्ण झाली आहेत. सहा कामे प्रगतीपथावर आहेत. ५६० सघमी जलसाठा झाला आहे. मंठा तालुक्यात १० कोटी ८३ लाखांचा निधी मंजूर झाला असून, १७ गावांत ४९ बंधारे होणार असून, १९ कामे पूर्ण झाली आहेत. १३ कामे प्रगतीपथावर आहेत. ३४० सहस्त्र घनमीटर (सघमी) एवढा जलसाठा झाला आहे.

Web Title: 75 bunk wait for work!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.