८ गटांसाठी ७३ जणांचे अर्ज वैध

By Admin | Updated: February 3, 2017 00:51 IST2017-02-03T00:43:29+5:302017-02-03T00:51:29+5:30

कळंब : तालुक्यातील जि.प.च्या ८ गटांसाठी ७३ उमेदवार, तर पं.स.च्या १६ गणांसाठी १५१ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत.

73 application forms for 8 groups are valid | ८ गटांसाठी ७३ जणांचे अर्ज वैध

८ गटांसाठी ७३ जणांचे अर्ज वैध

कळंब : तालुक्यातील जि.प.च्या ८ गटांसाठी ७३ उमेदवार, तर पं.स.च्या १६ गणांसाठी १५१ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. आज छाननीमध्ये गटातील ३ व गणातील ४ उमेदवारी अर्ज बाद झाले.
उपविभागीय कार्यालयामध्ये जि.प. व पं.स. उमेदवारांच्या अर्जांची छाननी करण्यात आली. प्रशासनाने निवडणूक अर्ज दाखल करतानाच परिपूर्ण अर्ज दाखल होईल, याकडे कटाक्षाने लक्ष दिल्याने छाननीत अर्ज बाद होण्याचे प्रमाण नगण्य राहिले. राजकीय पक्षाने दुसऱ्या क्रमांकावर प्राधान्य दिलेल्या एबी फॉर्ममधील उमेदवारांना अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात कायम ठेवण्यात आले. गुरूवारी पार पडलेल्या छाननी प्रक्रियेत हरिश्चंद्र कुंभार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून भरलेला उमेदवारी अर्ज बाद झाला. त्यांचा काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून अर्ज कायम राहिला.
या व्यतिरिक्त चंद्रकला तांदळे (खामसवाडी गट), श्रीहरी माळी (शिराढोण गट), बलवंत पांचाळ (चोराखळी गट), रविकांत पांचाळ (चोराखळी गण) व कविता शेळके (नायगाव गण) यांचे उमेदवारी अर्जही विविध कारणांमुळे बाद ठरविण्यात आले.

Web Title: 73 application forms for 8 groups are valid