७२ सरपंचांना मानधनाचा लाभ

By Admin | Updated: September 22, 2014 00:54 IST2014-09-22T00:43:52+5:302014-09-22T00:54:44+5:30

चापोली : विधानसभा निवडणुकीची धामधूम विचारात घेऊन आचारसंहिता लागण्यापूर्वी शासनाच्या वतीने सरपंचाच्या मानधन व भत्त्यात दुपटीने वाढ करण्याचा निर्णय झाला असून,

72 Benefits of Honor to Sarpanchs | ७२ सरपंचांना मानधनाचा लाभ

७२ सरपंचांना मानधनाचा लाभ


चापोली : विधानसभा निवडणुकीची धामधूम विचारात घेऊन आचारसंहिता लागण्यापूर्वी शासनाच्या वतीने सरपंचाच्या मानधन व भत्त्यात दुपटीने वाढ करण्याचा निर्णय झाला असून, याचा लाभ चाकूर तालुक्यातील ७२ सरपंचांना लाभ मिळणार आहे़
सरपंचांना लोकसंख्यानिहाय देण्यात येणाऱ्या मानधनात राज्यशासन ७५ टक्के अनुदान देण्यात येणार आहे़ तर २५ टक्के अनुदान हे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातून दिले जाणार आहे़ सरपंचाच्या मानधनाबरोबरच ग्रामपंचायत सदस्यांच्या बैैठक भत्त्यातही आठ पटीने वाढ करण्यात आली आहे़ भत्ता २५ रूपयावरून २०० रूपयांवर आल्याने सदस्यांत समाधान दिसून येत आहे़
ऐरवी मासिक बैैठकांकडे पाठफिरविणाऱ्या सदस्यांची वाढत्या भत्त्यामुळे उपस्थिती वाढणार आहे़ २ हजारांपर्यंत लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या सरपंचांना दरमहा ४०० रूपये, ८ हजारांपर्यंत लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीच्या सदस्यांना ६०० रूपये तर त्यावरील लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंचांना ८०० रूपये दरमहा मानधन दिले जात होते़ शासनाच्या निर्णयानुसार नव्याने हे मानधन अनुक्रम १०००, १५००, २००० रूपये करण्यात आल्याने सरपंचांना दिलासा मिळाला आहे़ (वार्ताहर)

Web Title: 72 Benefits of Honor to Sarpanchs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.