चैत्र एकादशीसाठी ७२ जादा बसगाड्या
By Admin | Updated: March 31, 2015 00:39 IST2015-03-30T23:54:45+5:302015-03-31T00:39:41+5:30
बीड : मंगळवारच्या चैत्र एकादशी आणि शिखर शिंगणापूरला जाण्यासाठी बीड विभागीय कार्यालयातून वेगवेगळ्या आगारातून ७२ जादा बस सोडल्या आहेत. हा कालावधी चार दिवसाचा असेल.

चैत्र एकादशीसाठी ७२ जादा बसगाड्या
बीड : मंगळवारच्या चैत्र एकादशी आणि शिखर शिंगणापूरला जाण्यासाठी बीड विभागीय कार्यालयातून वेगवेगळ्या आगारातून ७२ जादा बस सोडल्या आहेत. हा कालावधी चार दिवसाचा असेल.
चैत्र एकादशीसाठी पंढरपूरला दर्शनसाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. तसेच शिखर शिंगणापूरलाही मोठी यात्रा भरत असल्याने येथे बीड जिल्ह्यातून भाविक जात असतात. भाविकांची वाढती संख्या पाहता बीड विभागीय कार्यालयातून ७२ जादा बसगाड्यांची सोय करण्यात आली असल्याचे विभागीय वाहतूक अधिकारी उद्धव वावरे यांनी दिली. यासाठी ७ कर्मचारीही नियुक्त करण्यात आले असून सोमवार ते गुरूवार या कालावधीत या बस धावणार आहेत. (प्रतिनिधी)