७१ हजार विद्यार्थी गणवेशाविनाच
By Admin | Updated: July 4, 2017 23:41 IST2017-07-04T23:39:49+5:302017-07-04T23:41:39+5:30
हिंगोली : सर्व शिक्षा अभियानातील मोफत गणवेश योजनेत २०१७-१८ मध्ये ७४ हजार पात्र विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटपाचे शिक्षण विभागाला उद्दिष्ट आहे.

७१ हजार विद्यार्थी गणवेशाविनाच
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : सर्व शिक्षा अभियानातील मोफत गणवेश योजनेत २०१७-१८ मध्ये ७४ हजार पात्र विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटपाचे शिक्षण विभागाला उद्दिष्ट आहे. मात्र संबंधित गटशिक्षणाधिकारी व मुख्याध्यापकांनी यापैकी केवळ २५१८ विद्यार्थ्यांचीच माहिती गुगल फॉर्मवर भरली आहे. त्यामुळे ही गती राहिल्यास हजारो विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहण्याची भीती आहे.
शाळा उघडताच विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचे नियोजन बारगळले. आहे. त्यामुळे संबंधित तालुक्यांच्या गटशिक्षणाधिकारी व मुख्याध्यापकांना गणवेश योजनेतील लाभार्थ्यांची माहिती गुगल फॉर्मवर भरून देण्याच्या सूचना शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी दिल्या होत्या. परंतु ७४ हजारांपैकी केवळ २ हजार ५१८ विद्यार्थ्यांची माहिती गुगलवर फॉर्मवर भरण्यात आली. त्यामुळे उर्वरित ७१ हजार ४८२ विद्यार्थ्यांवर गणवेश योजनेपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे संबंधितांनी सर्व शिक्षाच्या गुगल फॉर्मवर विद्यार्थ्यांची तात्काळ माहिती भरण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी शिवाजी पवार यांनी केले. गुगल फॉर्मवर कळमनुरी तालुक्यातील १ हजार २२० मुला-मुलींची तर सेनगाव ७६०, औंढा येथील २५३, हिंगोली १३८ तसेच सर्वात कमी वसमत येथील १२३ विद्यार्थ्यांची माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे आता ही माहिती भरण्यास गती न दिल्यास विद्यार्थी गणेशापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.