७१ निवृत्त प्राध्यापकांना तीन वेतनवाढीचा लाभ

By Admin | Updated: July 6, 2014 00:35 IST2014-07-06T00:23:37+5:302014-07-06T00:35:11+5:30

औरंगाबाद : १ जानेवारी १९८६ पूर्वी पीएच.डी.प्राप्त केलेल्या ७१ सेवानिवृत्त प्राध्यापकांना तीन आगाऊ वेतनवाढीच्या फरकाचे धनादेश शनिवारी विद्यापीठात सभागृहात समारंभपूर्वक वितरित करण्यात आले.

71 retired professors benefit three increments | ७१ निवृत्त प्राध्यापकांना तीन वेतनवाढीचा लाभ

७१ निवृत्त प्राध्यापकांना तीन वेतनवाढीचा लाभ

औरंगाबाद : १ जानेवारी १९८६ पूर्वी पीएच.डी.प्राप्त केलेल्या ७१ सेवानिवृत्त प्राध्यापकांना तीन आगाऊ वेतनवाढीच्या फरकाचे धनादेश शनिवारी विद्यापीठात सभागृहात समारंभपूर्वक वितरित करण्यात आले.
सेवानिवृत्त प्राध्यापक संघटनेने तीन आगाऊ वेतनवाढी मिळण्यासाठी न्यायालयीन व प्रशासकीय पातळीवरचा प्रदीर्घ लढा दिला. संघटनेच्या या लढ्याला अखेर यश आले. शनिवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या महात्मा फुले सभागृहात सेवानिवृत्त प्राध्यापकांना आगाऊ वेतनवाढीच्या फरक रकमेच्या धनादेशांचे वितरण कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त प्राध्यापक संघटनेचे अध्यक्ष डॉ. एम. ए. वाहूळ, कुलसचिव डॉ. धनराज माने, ‘बीसीयूडी’चे संचालक डॉ. एस. पी. झांबरे, वित्त व लेखाधिकारी डॉ. एस. टी. सांगळे, डॉ. अशोक चव्हाण, डॉ. विजय लोमटे, डॉ. एच. ए. गणी, डॉ. कृष्णमूर्ती, डॉ. डी. जी. धुळे, डॉ. नारायण शर्मा, डॉ. पारस बोरा यांची उपस्थिती होती.
१ जानेवारी १९८६ पूर्वी पीएच.डी.प्राप्त संलग्नित महाविद्यालयीन प्राध्यापकांना आगाऊ वेतनवाढीचा लाभ मिळालेला होता; पण विद्यापीठातील ७१ निवृत्त प्राध्यापक या वेतनवाढीपासून वंचित राहिले होते.
त्यासाठी सेवानिवृत्त संघटनेने मोठा लढा दिला होता. धनादेश वितरण समारंभात बोलताना कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे म्हणाले की, विद्यापीठाच्या उभारणीत गेल्या ५० वर्षांमध्ये विविध विभागात कार्य केलेल्या प्राध्यापकांनी मोलाचे योगदान दिले आहे. या प्राध्यापकांना आगामी काळात विद्यापीठाच्या विविध उपक्रमात सहभागी करून घेतले जाईल.
कुलसचिव डॉ. माने प्रास्ताविकात म्हणाले की, या कार्यक्रमाच्या निमित्ताने निवृत्त प्राध्यापकांचे स्नेहमिलन घडले. या प्राध्यापकांच्या हक्कासाठी विद्यापीठ नेहमीच कटिबद्ध राहील. संघटनेचे अध्यक्ष डॉ. वाहूळ यांनी सेवानिवृत्त प्राध्यापकांचा हा प्रश्न सोडविण्यासाठी कुलसचिव डॉ. माने यांनी मोलाची मदत केल्याचा उल्लेख केला.

Web Title: 71 retired professors benefit three increments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.