एका जोडणीसाठी ७० हजार खर्च

By Admin | Updated: May 12, 2015 00:49 IST2015-05-12T00:20:17+5:302015-05-12T00:49:54+5:30

उस्मानाबाद : जिल्ह्यात सलग तीन वर्षांपासून अत्यल्प पाऊस होत असल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे. अशा परिस्थितीत आहे

70 thousand spend for a connection | एका जोडणीसाठी ७० हजार खर्च

एका जोडणीसाठी ७० हजार खर्च



उस्मानाबाद : जिल्ह्यात सलग तीन वर्षांपासून अत्यल्प पाऊस होत असल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे. अशा परिस्थितीत आहे त्या पाणीसाठ्यावर पिके जगविण्याचा प्रयत्न सुरू असतानाच दुसरीकडे डिमांड भरूनही वीज कनेक्शन देण्यास महावितरणकडून टाळाटाळ केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील ७ हजार १७६ शेतकऱ्यांनी कृषी पंपांना वीज पुरवठा मिळावा यासाठी महावितरणकडे ३५ कोटी ६८ लाख रुपये भरले आहेत. मात्र, अद्याप या शेतकऱ्यांना विद्युत कनेक्शन मिळाले नसल्याने शेतकऱ्यांसमोरील अडचणी वाढत चालल्या आहेत.
शासन शेतकऱ्यांच्या उच्चाटनासाठी अनेक प्रयत्न करीत आहे. शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या रोखण्यासाठी शेती व्यवसायाच्या विकासाच्या नवनवीन योजना राबविल्या जात आहेत. शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात खर्च करुन विहीर, बोअरवेल घेतले. मात्र, त्याला वीज कनेक्शन मिळत नसल्याने पाणी असूनही ते पिकांना देत येत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे हे शेतकरी दररोज वीज वितरण कार्यालयाकडे खेटे मारत आहेत. मार्च २०१४ अखेर जिल्ह्यातील ९ हजार ५२९ शेतकऱ्यांनी विद्युत कनेक्शन मियण्यासाठी महावितरणकडे नियमानुसार डिमांड भरले. मात्र, यातील ६ हजार ६८ शेतकऱ्यांना कनेक्शन मिळालेले नाही. तर मार्च २०१५ अखेरपर्यंत वीज कनेक्शनच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांचा आकडा ७ हजार १७६ वर जावून पोहोंचला आहे. (प्रतिनिधी)
शेतकऱ्यांच्या कृषी पंपाना विद्युत कनेक्शन देण्यासाठी २५ शेतकऱ्यांमध्ये एक डीपी असणे गरजेचे आहे. तसेच प्रत्येक शेतकऱ्यांना सरासरी तीन विद्युत खांबाची आवश्यता असते. एका शेतकऱ्याला वीज कनेक्शन देण्यासाठी महावितरणला ७० हजार रुपये खर्च करावे लागतात. सद्यस्थितीत शेतकऱ्यांना कनेक्शन देण्यासाठी २० कोटी रुपयांचे आॅनलाईन टेंडर काढण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती महावितण कार्यालयातील सुत्रांनी दिली.

Web Title: 70 thousand spend for a connection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.