प्राधिकरणासाठी घाटीत ७० टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 23:57 IST2017-12-28T23:57:00+5:302017-12-28T23:57:03+5:30
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विविध प्राधिकरण मंडळाच्या निवडणुकीसाठी गुरुवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत मतदान झाले. दिवसभरात ७० टक्के मतदान झाल्याचे समजते.

प्राधिकरणासाठी घाटीत ७० टक्के मतदान
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विविध प्राधिकरण मंडळाच्या निवडणुकीसाठी गुरुवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत मतदान झाले. दिवसभरात ७० टक्के मतदान झाल्याचे समजते.
विद्यापीठ अधिसभेसाठी मुंबई, पुणे, नाशिक आणि औरंगाबाद या विभागांत उमेदवारांची लढत झाली. औरंगाबाद विभागात या निवडणुकीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, उपअधिष्ठाता प्रा. डॉ. शिवाजी सुक्रे, डॉ. मोहन डोईबळे, डॉ. सुभाष भोयर, डॉ. ज्ञानेश्वर चिंते हे उमेदवार होते.
यामध्ये दोन उमेदवारांनी इतरांना पाठिंबा दिला. सकाळी १० ते ४ यावेळेत मतदान झाले. ३० डिसेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. काही प्राधिकरणांमध्ये उमेदवारांनी माघार घेतल्याने बिनविरोध निवड झालेल्या उमेदवारांच्या निवडीचीही औपचारिक घोषणा याच दिवशी होणार आहे.