बौद्ध स्मशानभूमीसाठी ७० लाख
By Admin | Updated: August 29, 2014 01:30 IST2014-08-29T00:51:53+5:302014-08-29T01:30:44+5:30
परभणी : शहरातील दलित वस्तीमध्ये ५० टक्के निधी देण्याचे मान्य करीत धाररोडवरील बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीसाठी ७० लाख रुपयांचा निधीला महापौर प्रताप देशमुख यांनी मान्यता दिली आहे.

बौद्ध स्मशानभूमीसाठी ७० लाख
परभणी : शहरातील दलित वस्तीमध्ये ५० टक्के निधी देण्याचे मान्य करीत धाररोडवरील बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीसाठी ७० लाख रुपयांचा निधीला महापौर प्रताप देशमुख यांनी मान्यता दिली आहे.
शहर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा महापौर प्रताप देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली २८ आॅगस्ट रोजी बी.रघुनाथ सभागृहात पार पडली. आयुक्त अभय महाजन, उपायुक्त रणजीत पाटील, नगरसचिव चंद्रकांत पवार यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. प्रारंभी मागील सभेच्या इतिवृत्तांतास मान्यता देण्यात आली. दलित वस्ती निधीअंतर्गत २०१४-१५ करीता प्रस्तावास मान्यता व निर्णय घेण्याच्या विषयावर चर्चा झाली. त्याचप्रमाणे बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीला लागूनच असलेल्या लिंगायत स्मशानभूमीसाठी निधी देण्याचे या सभेत मान्य केले. दलित वस्तीमध्ये २०१४-१५ मध्ये ३ कोटी ६४ लाख रुपये मंजूर केले आहेत. या विषयावर अनिता सोनकांबळे, सचिन देशमुख, सुनील देशमुख, सय्यद अहमद, गुलमीर खान, रझिया बेगम, युनूस सरवर, चाँद सुभाना जाकेर खान या नगरसेवकांनी प्रत्येक समाजातील स्मशानभूमीसाठी निधी द्यावा, अशी मागणी केली. ही मागणी महापौरांनी मान्य केली.
शहरात नवीन रस्त्यांना मंजुरी देण्यात येणार आहे, या वियषावर चर्चेदरम्यान नगरसेवक शिवाजी भरोसे, अॅड. जावेद कादर, सुनील देशमुख, विजय धरणे, सय्यद अहमद, श्याम खोबे, शांताबाई लंगोटे, संगीता कलमे यांनी आमच्या प्रभागात रस्त्याची कामे घ्यावीत, अशी मागणी केली. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कामांना प्राप्त अनुदानाव्यतिरिक्तची कामे प्राप्त होणाऱ्या रस्ता अनुदानातून करण्याच्या विषयावर विरोधी पक्ष नेते भगवान वाघमारे यांनी कामास मंजुरी दिली.
या सर्वसाधारण सभेत विविध विषयावर झालेल्या झालेल्या चर्चेमध्ये गुलमीर खान, शिवाजी भरोसे, विजया कनले, संगीता वडकर, शांताबाई लंगोटे, संगीता कलमे, विजय धरणे, डॉ.विवेक नावंदर, उदय देशमुख, सचिन देशमुख, चाँद सुभाना जाकेर लाला, सईदा बेगम इफ्तेखारोद्दीन, रजिया बेगम, आमेनाबी शेख नबी, तिरुमला खिल्लारे, अब्दुला फातेमा अब्दुल जावेद, सचिन कांबळे, मुखीम काजी, रुक्साना बेगम रौफ खान, अमरिका बेगम अ. समद आदींनी सहभाग घेतला. या सभेत शहरातील विविध विकासप्रश्नांवर चर्चा झाली. (प्रतिनिधी)