शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

बिबट्याने पाडला ७ मेंढ्यांचा फडशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2017 12:46 AM

मागील दोन महिन्यांपासून धुमाकूळ घालणाºया बिबट्याने सोमवारी रात्री लखमापूर शिवारात तब्बल सात मेंढ्यांचा फडशा पाडला. मोकाट बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे प्रयत्न मात्र शून्य असल्याने परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्ककायगाव : मागील दोन महिन्यांपासून धुमाकूळ घालणाºया बिबट्याने सोमवारी रात्री लखमापूर शिवारात तब्बल सात मेंढ्यांचा फडशा पाडला. मोकाट बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे प्रयत्न मात्र शून्य असल्याने परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत.नेवासा येथील पशुपालक अण्णासाहेब बुचडे आपल्या शेकडो मेंढ्या घेऊन चारा-पाण्याच्या शोधात कायगाव परिसरात आले आहे. सोमवारी रात्री एक वाजेच्या सुमारास त्यांच्या जाळीच्या साह्याने बंदिस्त केलेल्या मेंढ्याच्या कळपात बिबट्याने उडी घातली. त्यातील मेंढ्यांवर हल्ला करून बिबट्याने पाच पिल्ले आणि दोन मेंढ्यांना अक्षरश: फाडले. एकाच रात्री सात मेंढ्यांवर हल्ला झाल्याचे मंगळवारी सकाळीच पशुपालक अण्णासाहेब बुचडे यांच्या लक्षात आले. याबाबत त्यांनी जवळपास शेतवस्त्यावर राहणाºया शेतकºयांना कळविले. जमलेल्या लोकांनी वनविभागाच्या कर्मचाºयांना फोन लावला. मात्र वनविभागाच्या कर्मचाºयांनी फोन घेतला नसल्याचे शेतकºयांनी सांगितले.कायगावचे पशुवैद्यकीय अधिकाºयांनी घटनास्थळी जाऊन मृत मेंढ्यांची पाहणी केली. मंगळवारी सायंकाळी वनरक्षक डी.यू. गाडगीळ यांनी पंचनामा केला. दोन दिवसांपूर्वी याच शिवारात बिबट्याने नजीर पठाण यांच्या शेतवस्तीवर असलेल्या वासराचा फडशा पाडला होता.सोमवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास जुने कायगाव येथील सोमनाथ गायकवाड यांच्या जामगाव शिवारातील शेतात उसाची ट्रक भरण्याचे काम सुरू होते. यावेळी तेथील ऊसतोड कामगारांच्या बैलांवर बिबट्याने धाव घेतली. मात्र समयसूचकता पाळून उपस्थित असलेल्या सगळ्या ऊसतोड कामगारांनी आरडाओरड करून आणि मशाल पेटवून बिबट्याला पिटाळून लावले. तर मंगळवारी दुपारी तीन वाजता पुन्हा जवळच्या फटांगडे यांच्या शेतात बिबट्याचे दर्शन झाले . बिबट्याच्या वारंवार होणाºया हल्ल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. वनविभागाने तात्काळ बिबट्याच्या बंदोबस्तासाठी मोहीम हाती घेण्याची मागणी कायगाव भागातील शेतकºयांनी केली आहे.