गटविकास अधिकाऱ्यासह ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By Admin | Updated: September 13, 2014 23:42 IST2014-09-13T23:42:06+5:302014-09-13T23:42:06+5:30
रेणापूर : न्यायालयाच्या आदेशावरून रेणापूरचे गटविकास अधिकारी शाम पटवारी यांच्यासह पंचायत समितीतील अन्य सहा जणांविरूद्ध शनिवारी रेणापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

गटविकास अधिकाऱ्यासह ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
रेणापूर : न्यायालयाच्या आदेशावरून रेणापूरचे गटविकास अधिकारी शाम पटवारी यांच्यासह पंचायत समितीतील अन्य सहा जणांविरूद्ध शनिवारी रेणापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
एमआरजीएसअंतर्गत गटविकास अधिकाऱ्यांनी केलेल्या कामाची चौकशी करण्यात यावी़ या मागणीचे निवेदन संभाजी सेनेचे कार्यकर्ते १९ जून रोजी रेणापूर पंचायत समितीकडे देण्यासाठी गेले होते, तेव्हा गटविकास अधिकाऱ्यांनी बंकट दत्त यास मारहाण करून जखमी केले होते़ त्यामुळे या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली़ त्यामुळे न्यायालयाने १० सप्टेंबर रोजी गटविकास अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश रेणापूर पोलिसांना दिले होते़
या आदेशानुसार शनिवारी रेणापूर पोलिसांनी गटविकास अधिकारी शाम पटवारी, पंचायत समितीचे कर्मचारी संतोष शिंदे, मोतीराम राठोड, भारत काळे, राजू काळे, डी़पी़चिल्लरगे, संजय जाधव या सातजणांविरूद्ध कलम ३०७, ३२४, ३२३, ५४२, ५०४, ५०६ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोनि़ दिलीप पाटील करीत आहेत़ (वार्ताहर)