लग्नाचे आमिष दाखवून महिलेला ७ लाखांचा गंडा
By Admin | Updated: January 2, 2016 23:59 IST2016-01-02T23:47:10+5:302016-01-02T23:59:37+5:30
औरंगाबाद : वर्तमानपत्रात वधू पाहिजे, अशी जाहिरात देऊन एक जणाने शहरातील चार्टर्ड अकाऊंटंट महिलेस लग्नाचे आमिष दाखवून दिल्ली येथील

लग्नाचे आमिष दाखवून महिलेला ७ लाखांचा गंडा
औरंगाबाद : वर्तमानपत्रात वधू पाहिजे, अशी जाहिरात देऊन एक जणाने शहरातील चार्टर्ड अकाऊंटंट महिलेस लग्नाचे आमिष दाखवून दिल्ली येथील दोन जणांनी तब्बल ६ लाख ८५ हजार रुपयांचा गंडा घातला. विशेष म्हणजे आई गंभीर आजाराशी झुंज देत असल्याने तिच्या उपचारासाठी पैशांची गरज असल्याचे त्यांनी तिला सांगितले. आरोपींवर विश्वास ठेवून तक्रारदार महिलेने चक्क विमानाने दिल्लीला जाऊन आरोपीने पाठविलेल्या माणसाच्या हवाली ही रक्कम केली. याप्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात बहीण-भावांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपकार ग्रोवर आणि अमिता (रा. कॅनॉट प्लेस, दिल्ली) अशी आरोपींची नावे आहेत. प्राप्त माहिती अशी की, दिल्लीतील अशोका रोडवरील कॅनॉट प्लेस येथील रहिवासी असलेल्या आरोपींनी शहरातील एका वर्तमानपत्रात वधू पाहिजे, अशी जाहिरात दिली होती. या जाहिरातीमधील क्रमांकावर झांबड इस्टेट येथील घटस्फोटित ३६ वर्षीय महिलेने संपर्क साधला. त्यानंतर आरोपींनी फेसबुक, व्हॉटस्अॅप आणि मोबाईलवर सतत संपर्क साधून संभाषण करीत असत. एवढेच नव्हे तर उपकारने तिला लग्न करण्याचे आमिष दाखवून तिच्याशी भावनिक नाते निर्माण केले. यावेळी दोन्ही आरोपींनी तक्रारदार महिलेच्या बँक खात्यात