जिल्ह्यात ६९.३३ टक्के मतदान
By Admin | Updated: October 17, 2014 00:26 IST2014-10-17T00:16:16+5:302014-10-17T00:26:55+5:30
जालना : जिल्ह्यात पाचही मतदारसंघात एकूण सरासरी ६९.३३ टक्के मतदान झाले. गुरूवारी प्रशासनाने मतदानाबाबतची अंतिम आकडेवारी जाहीर केली.

जिल्ह्यात ६९.३३ टक्के मतदान
जालना : जिल्ह्यात पाचही मतदारसंघात एकूण सरासरी ६९.३३ टक्के मतदान झाले. गुरूवारी प्रशासनाने मतदानाबाबतची अंतिम आकडेवारी जाहीर केली.
जिल्ह्यात बुधवारी रात्री उशिरापर्यंत मतदारसंघाच्या मुख्यालयी स्ट्राँग रूममध्ये ईव्हीएम यंत्रे दाखल करण्याचे काम सुरू होते.
जिल्ह्यात पाचही मतदारसंघांमध्ये उत्साहीपूर्ण वातावरणात मतदान झाले. यात प्रामुख्याने नवमतदारांची संख्या वाढलेली असल्याने त्यांनी उत्स्फुर्तपणे मतदानाचा हक्क बजावला. जिल्हा प्रशासनासह विविध सामाजिक, सेवाभावी संघटनांच्या वतीने जनजागरण मोहिम राबविल्याचा सकारात्मक परिणाम जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढण्यावर झाल्याचे दिसून येते.
जिल्ह्यात सर्वाधिक मतदानाची नोंद घनसावंगी मतदारसंघात झाली. तेथे ७५.३५ टक्के मतदान झाले. त्यापाठोपाठ भोकरदन ७४.०७, परतूर ७०.०३, बदनापूर ६७.६९ तर सर्वात कमी जालना मतदारसंघात ६०.१० टक्के मतदानाची नोंद झाली.
प्रत्येक मतदारसंघाच्या मुख्यालयी ईव्हीएम मशीन बुधवारी रात्री उशिरापर्यंत दाखल करण्यात आल्या. जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी जालना येथील आयटीआय या मतमोजणी केंद्रास भेट देऊन तेथील पाहणी केली. सर्व ईव्हीएमचे सिलिंग करण्यात येऊन त्या स्ट्राँगरूम मध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्याची माहिती शासकीय सूत्रांनी दिली. १९ आॅक्टोबर रोजी सकाळी ८ वाजेपासून जिल्ह्यातील पाचही मतमोजणी केंद्रांवर मतमोजणीची प्रक्रिया सुरू होणार आहे.
निकाल दुपारी २ वाजेपर्यंत हाती येतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे. (प्रतिनिधी)