मंठा-वाटूर कामावर ६८ लाख, हेलस कामासाठी १ कोटी ७ लाखांचा निधी
By Admin | Updated: September 17, 2014 01:11 IST2014-09-17T00:30:54+5:302014-09-17T01:11:22+5:30
मंठा : मंठा- वाटूर रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून, बरबडा-केंधळी या परिसरातील तीन किलोमीटर कामासाठी ६८ लाखांचा निधी मंजूर असून,

मंठा-वाटूर कामावर ६८ लाख, हेलस कामासाठी १ कोटी ७ लाखांचा निधी
मंठा : मंठा- वाटूर रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून, बरबडा-केंधळी या परिसरातील तीन किलोमीटर कामासाठी ६८ लाखांचा निधी मंजूर असून, त्यापैकी झालेल्या कामाची एक महिन्यातच वाट लागल्याने या जालना-जिंतूर हायवेवर खड्डेच खड्डे झाले आहेत.
मंठा ते वाटूर आणि मंठा ते परभणी जिल्हा सरहद या जालना-जिंतूर हायवे रस्त्याच्या डांबरीकरण व दुरूस्तीसाठी वेगवेगळ्या कामांना सुमारे एक कोटी ७ लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. असे असतानाही हेलस फाटा, हेलस नदीवरील पुलालगत व सरहद्दीलगत सुमारे २७ लाख रुपयांचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली झालेले आहे. मंठा ते हेलस या दुसऱ्या कामासाठी ८० लाख रूपयांचा निधी मंजूर असून, यामध्ये ३.६०० कि़मी. काम मार्चपर्यंत होणे अपेक्षित असताना संबंधित गुत्तेदारांनी हे काम केले नसल्याची माहिती शाखा अभियंता पी.ए. सरगुळे यांनी दिली. मंठा केंधळी या ६८ लाख रुपये निधी पैकी केवळ एक कि़मी. काम झाले असून, तेही पूर्ण उखडल्याने वाहनधारक त्रस्त आहेत. (वार्ताहर)