‘एसटी’च्या ६७८ फेऱ्या रद्द, रेल्वे प्रवासी ५० टक्क्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:02 IST2021-03-14T04:02:51+5:302021-03-14T04:02:51+5:30
सिडको बसस्थानकातील ११२ आणि मध्यवर्ती बसस्थानकातील १२० एसटी फेऱ्या रद्द झाल्या. प्रवाशांची संख्या तुरळक होती. त्यामुळे प्रवाशांच्या प्रतीक्षेत फलाटावर ...

‘एसटी’च्या ६७८ फेऱ्या रद्द, रेल्वे प्रवासी ५० टक्क्यांवर
सिडको बसस्थानकातील ११२ आणि मध्यवर्ती बसस्थानकातील १२० एसटी फेऱ्या रद्द झाल्या. प्रवाशांची संख्या तुरळक होती. त्यामुळे प्रवाशांच्या प्रतीक्षेत फलाटावर बस उभ्या राहिल्या. प्रवाशांची संख्या पुरेशी नसल्याने बसगाड्या रद्द करण्यात येत होत्या. सायंकाळपर्यंत जिल्ह्यातील ८ आगारांतील ६७८ फेऱ्या रद्द झाल्या. यातून तब्बल ७८ हजार ९४० कि.मी. चा प्रवासही रद्द झाला. ज्या बसगाड्या धावल्या, त्याही ३० ते ४० टक्के प्रवासी घेऊन धावत होत्या. ४५० बसेसपैकी साधारण २२५ बसेस धावल्याची माहिती विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी दिली. रेल्वेगाड्यांना नेहमीच्या तुलनेत ५० टक्के प्रवासी कमी होते, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. कडक लॉकडाऊनचा विमानसेवेवर काहीही परिणाम झाला नसल्याचे विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे यांनी सांगितले.