डीसीसीत ६७१ कोटींच्या ठेवी; ९४९ कोटींचे शेतीकर्ज

By Admin | Updated: April 16, 2016 23:26 IST2016-04-16T23:19:28+5:302016-04-16T23:26:14+5:30

बीड : बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्थीक वर्षाचा हिशोब पुर्ण झाला असून सद्य अहवालावरुन बँक पुर्वपदावर येण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली

671 crore deposits in DCC; 9.49 crore agricultural credit | डीसीसीत ६७१ कोटींच्या ठेवी; ९४९ कोटींचे शेतीकर्ज

डीसीसीत ६७१ कोटींच्या ठेवी; ९४९ कोटींचे शेतीकर्ज

बीड : बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्थीक वर्षाचा हिशोब पुर्ण झाला असून सद्य अहवालावरुन बँक पुर्वपदावर येण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली असल्याचा विश्वास अध्यक्ष आदित्य सारडा यांनी व्यक्त केला आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे सध्या ६७१ कोटींच्या ठेवी, तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकंदरीत कृषी कर्ज ९४९ कोटी ४४ लाख रुपये आहे. कृषी कर्ज हे ८४. ६० टक्के आहे. जिल्ह्यातील साखर कारखाना, सुत गिरणी, औद्यागिक, शिक्षण, संस्था व इतर बिगर शेती संस्थाकडे बँकेचे १०७ कोटी २६ लाख रुपये तर पगारदार संस्थाकडे ६५ कोटी ५२ लाख असे १ हजार १२२ कोटी २२ लाख रुपये कर्ज असल्याची माहिती अध्यक्ष सारडा यांनी दिली. मार्च २०११ अखेर बँकेकडे १ हजार १९७ कोटी ऐवढ्या ठेवी होत्या. म्हणजेच ५२५ कोटी आज पर्यंत ठेवीदारांच्या ठेवी परत केलेल्या आहेत. यामुळे एक वर्षामध्ये ७१ कोटी व्याजारी रक्कम पुर्ण वजा करता ६७१ कोटी इत्या ठेवी शिल्लक आहेत. परंतू बँकेचे मोठ्या प्रमाणात कर्ज येणे आहे. १ हजार १२२ कोटी २२ लाख रुपये इतके कर्ज येणे आहे. म्हणजेच बँकेकडे ४५० कोटी ७७ लाख रुपये स्वनिधी आहे. त्यामध्ये बुडीत व संशयीत कर्ज निधी २१७ कोटी व व्याजापोटीची तरतूद १९९ कोटी ९९ लाख रुपये आहे. नियमाप्रमाणे सरकारी कर्जरोख्यात एकुण ७१ कोटी ६६ लाख रुपये म्हणजे १० टक्के रक्कम गुंतवली आहे. राज्य बँकेमध्ये १६३ कोटी ठेवी आहेत तर बँकेकडे रोखनिधी ४७ कोटी ६७ लाख रुपये असून बँकेची एकुण गुंंतवणूक २४४ कोटी ३८ लाख आहे. महाराष्ट्र राज्य बँकेकडे डीसीसीचे २१७ कोटी व राज्य बँकेतील मुदतठेवीवर ४७ कोटी ४० लाख रुपये कर्ज आहे असे अध्यक्ष सारडा म्हणाले. बँकेचे संचालक मंडळ डीसीसी पुर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षीत आहेत. त्या टप्या-टप्याने काढाव्यात असे आवाहन सारडा यांनी केले. बँकेचे उपाध्यक्ष गोरख धुमाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी विकासराव देशमुख, उपव्यवस्थापक रवी उबाळे, दिपक तळकरी, बँकेचे कर्मचारी सचिन गायकवाड, मन्सुर पठाण, उपरे, वाघमारे, कुलकर्णी यावेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: 671 crore deposits in DCC; 9.49 crore agricultural credit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.