भंगारातून ६६ लाख रूपयांचे उत्पन्न!

By Admin | Updated: October 1, 2016 01:07 IST2016-10-01T00:49:03+5:302016-10-01T01:07:19+5:30

जालना : जिल्ह्यातील चार आगारांमधून निघालेल्या भंगार साहित्यातून एसटीला तब्बल ६६ लाख २७ हजार रूपयांचे उत्पन्न झाले आहे. सहा वर्षांतील हा आकडा रेकॉर्ड बे्रक असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.

66 lakhs of rupees! | भंगारातून ६६ लाख रूपयांचे उत्पन्न!

भंगारातून ६६ लाख रूपयांचे उत्पन्न!


जालना : जिल्ह्यातील चार आगारांमधून निघालेल्या भंगार साहित्यातून एसटीला तब्बल ६६ लाख २७ हजार रूपयांचे उत्पन्न झाले आहे. सहा वर्षांतील हा आकडा रेकॉर्ड बे्रक असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.
जिल्ह्यात जाफराबाद, जालना, परतूर आणि मंठा असे चार आगार आहेत. या आगारांमध्ये बसेसच्या दुरूस्तीमधून खराब झालेले साहित्य मोठ्या प्रमाणात होते. यावर्षी विभागीय नियंत्रक पी.पी.भुसारी यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन केले. त्यामुळे भंगाराचा व्यवहार करताना पारदर्शकता आणली. यासाठी मागील महिनाभरापासून इ-प्रणालीद्वारे लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू होती. २७ सप्टेंबर रोजी याचा लिलाव केला असता सहा वर्षांतील विक्रम मोडित काढत ६६ लाखांचे उत्पन्न झाले.
या भंगारामध्ये टायर, अ‍ॅल्युमिनअम, बसेसचे पाटे, लोखंड, पत्रा, ड्रम, फायबर, ट्युब आदी साहित्यांचा समावेश आहे. लिलाव झाल्यापासून दहा दिवसांत २५ टक्के रक्कम भरून हे साहित्य उचलणे आवश्यक आहे. त्यानंतर त्याला १८ टक्के दराने व्याज लावले जाते. त्यानंतरही हे साहित्य उचलले नाही तर जागेचेही भाडे आकारले जाणार असल्याचे भांडार अधिकारी टी. एस.बुद्धेवार यांनी सांगितले.

Web Title: 66 lakhs of rupees!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.