आयटीआयला ६५१ प्रवेश ,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:26 IST2020-12-17T04:26:04+5:302020-12-17T04:26:04+5:30

व्यावसायिक शिक्षण : प्रवेश प्रक्रीया अंतिम टप्प्यात औरंगाबाद ः जिल्ह्यातील १७ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांत प्रवेशाच्या दोन फे-र्या पुर्ण झाल्या ...

651 admissions to ITI, | आयटीआयला ६५१ प्रवेश ,

आयटीआयला ६५१ प्रवेश ,

व्यावसायिक शिक्षण : प्रवेश प्रक्रीया अंतिम टप्प्यात

औरंगाबाद ः जिल्ह्यातील १७ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांत प्रवेशाच्या दोन फे-र्या पुर्ण झाल्या आहेत. त्यात ६५१ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले असुन इलेक्लिशियन ट्रेडला यात सर्वाधिक पसंती पहायला मिळाली. प्रवेशाची तिसरी फेरी शनिवारपासून सुरु झाली असुन डिसेंबर अखेर प्रवेश प्रक्रीया पुर्ण होणार आहे.

जिल्ह्यात ६ खाजगी तर ११ शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था आहे. आतापर्यंत पार पडलेल्या प्रवेश फेर्यांत ६५१ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असुन तिस-र्या फेरीला शनिवारपासून सुरुवात झाली. २३.८२ टक्के प्रवेश आतापर्यंत निश्चित झाल्याने तिस-र्या आणि चाैथ्या प्रवेश फेरीकडे आयटीआयचे लक्ष लागले आहे. गरज पडल्यास पाचवी फेरी होईल.

द्वितीय वर्षाचा अभ्यासक्रम पुर्ण करण्याच्या सूचना होत्या. त्यानुसार अभ्यासक्रम पुर्ण करण्यात आला. नुकत्याच या विद्यार्थ्यांच्या ड्राॅईंग आणि प्रात्यक्षिक परिक्षा झाल्या आहेत. प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमासंबंधी प्रवेश प्रक्रीया पुर्ण झाल्यावर शासनाकडून सुचना येतात. त्यानुसार वर्ग जानेवारीत सुरु होण्याची शक्यता आहे. दरवर्षी ही प्रक्रीया ऑगस्टमध्ये पुर्ण होते. मात्र, यावर्षी आरक्षणाच्या स्तगिती आणि कोरोनामुळे प्रवेश प्रक्रीया लांबणीवर पडली.

---

दोन फेर्यांत ६५१ प्रवेश निश्चित

पहिल्या प्रवेश फेरीत ४१६ जणांना प्रवेश निश्चित केले. दुसर्या फेरीत २३५ प्र्वेश निश्चित झाले. तर शनिवारपासून तिसर्या प्रवेश फेरीला सुरुवात झाल्याचे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे सहसंचालक एस. आर. सुर्यवंशी यांनी सांगितले. डिसेंबर अखेर प्रवेश चार व गरज पडल्यास पाचवा राऊंड पुर्ण होईल, त्यानंतर शासनाच्या वर्ग सुरु करण्याच्या मार्गदर्शक सुचना आल्यावर प्रत्यक्ष वर्ग सुरु होतील. असेही सुर्यवंशी म्हणाले.

--

विद्यार्थ्यांचा कल

जिल्ह्यात ३६ ट्रेडच्या २३४० जागा उपलब्ध आहेत. त्या सर्वच ट्रेडला विद्यार्थी पसंती देतात. दोन फेर्यांत २३. ८२ टक्के प्रवेश निश्चित झाले. त्यानुसार इलेक्ट्रिशियन, वायमन, फिटर, स्टेनोग्राफर मराठी आणि इंग्रजी, मॅकेनिक या ट्रेडला सर्वाधिक पसंती पहायला मिळत आहे.

---

१७

जिल्ह्यातील आयटीआय

---

२३४०

प्रवेश क्षमता

---

६५१

आतापर्यंत प्रवेश

Web Title: 651 admissions to ITI,