शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
5
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
6
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
8
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
9
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
10
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
11
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
12
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
13
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
14
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
15
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
16
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
17
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
18
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
19
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
20
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
Daily Top 2Weekly Top 5

६५ हजार शेतकऱ्यांनी भरला पीकविमा

By admin | Updated: July 30, 2014 00:49 IST

दिनेश गुळवे, बीड जिल्ह्यात यावर्षी समाधानकारक पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

दिनेश गुळवे, बीडजिल्ह्यात यावर्षी समाधानकारक पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे अनेक शेतकरी पीक विमा भरण्यासाठी अग्रही असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी सर्वाधिक पीकविमा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत भरला आहे. मंगळवारीही सुटीच्या दिवशी बॅँक सुरू असल्याने शेतकऱ्यांनी पीक विमा भरण्यासाठी गर्दी केली होती. बीड जिल्ह्यात गेल्यावर्षीही दुष्काळजन्य परिस्थिती होती. पाऊस समाधानकारक पडला असला तरी पावसाने ओढ दिल्याने उत्पादन घटले होते. परिणामी एक लाख शेतकऱ्यांना शंभर कोटींपेक्षा अधिक रुपयांचा पीक विम्यापोटी रक्कम मिळाली होती. यावषीही पावसाळा सुरू होऊन अद्यापही पावसाचे प्रमाण अवघे १२० मि.मी.च आहे. गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या अल्प पावसावर शेतकऱ्यांनी कपाशी, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, तीळ आदी पिकांचा पेरा केला आहे. असे असले तरी पेरणीनंतर अद्यापही मोठा पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांच्या जिवाला धास्ती लागली आहे. शेतकऱ्यांनी बियाणे, खत, मशागत यावर मोठा खर्च केला आहे. अशा परिस्थितीत नैसर्गिक आपत्ती आल्यास आर्थिक सहाय्य मिळावे, यासाठी पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. पीक विमा भरण्यास शेतकऱ्यांना अडचणी येऊ नयेत, यासाठी मंगळवारी सुटी असतानाही डीसीसी बॅँकेच्या सर्व ५९ शाखा सुरू ठेवण्यात आल्याची माहिती बॅँकेचे व्यवस्थापक अरूण कदम यांनी दिली. यामुळे शेतकऱ्यांनी मादळमोही, परळी, धर्मापुरी, आष्टी, अंमळनेर, पाटोदा, पाचंग्री, चौसाळा, नेकनूर, बर्दापूर, चकलांबा, धोंडराई, उमापूर, गंगामसला, तलवाडा आदी शाखांमध्ये गर्दी केली होती. मंगळवार पर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या ५९ शाखांमध्ये जवळपास ६५ हजार शेतकऱ्यांनी पीक विम्यापोटी दहा कोटी रुपये भरल्याची माहिती बॅँकेचे उपव्यवस्थापक रवि उबाळे यांनी दिली. गेल्या वर्षीही डीसीसीमध्ये सर्वाधिक म्हणजे जवळपास ८० हजार शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता. यावर्षीही पीक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या आणखी वाढेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पीक विमा भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै असल्याचेही ते म्हणाले.शेतकऱ्यांनी पीकविमा वेळेत भरावापीक विमा भरण्यासंदर्भात जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले की, नैसर्गिक आपत्ती आल्यास व त्यामुळे उत्पादनावर परिणाम झाल्यास पीक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते, यामुळे शेतकऱ्यांना फायदा होता. यावर्षी शेतकऱ्यांना शंभर कोटींपेक्षा अधिक रक्कम पीक विम्यापोटी मिळालेली आहे. शेतकऱ्यांनी पीक विमा वेळेत भरावा, असे आवाहनही त्यांनी केले.