६५ लाख विद्यार्थ्यांची घेणार कल चाचणी; पण प्रवेशाची हमी नाही
By Admin | Updated: November 16, 2015 00:40 IST2015-11-16T00:23:27+5:302015-11-16T00:40:27+5:30
औरंगाबाद : दहावीत शिकत असलेल्या राज्यातील ६५ लाख विद्यार्थ्यांची कल चाचणी घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

६५ लाख विद्यार्थ्यांची घेणार कल चाचणी; पण प्रवेशाची हमी नाही
औरंगाबाद : दहावीत शिकत असलेल्या राज्यातील ६५ लाख विद्यार्थ्यांची कल चाचणी घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यभरात फक्त ५३९ समुपदेशक असल्याने या चाचण्यांसाठी मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेतली जाणार आहे. चाचणीनंतर विद्यार्थ्याचा कल समजला तरी आवडीच्या क्षेत्रात मात्र प्रवेश देण्याची हमी मात्र घेतली जाणार नाही.
विद्यार्थ्यांचा कल विचारात घेऊन आवडीनुसार व क्षमतेनुसार शैक्षणिक क्षेत्र निवडीस वेळीच मदत केल्यास त्यांच्या उपजत कलागुणांना पुरेसा वाव मिळतो, ही गोष्ट लक्षात घेऊन दहावीच्या विद्यार्थ्यांची कल चाचणी घेण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. राज्यात जवळपास २२ हजार माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा असून, त्यामध्ये ६५ लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत; परंतु राज्यात सध्या फक्त ५३९ समुपदेशकच कार्यरत आहेत. त्यामुळे कल चाचण्यांसाठी मानसोपचारतज्ज्ञांची मदत घ्यावी लागणार आहे. बहुतांश मानसोपचारतज्ज्ञ खाजगी सेवेत असल्याने कल चाचण्यांसाठी तयार होतील काय, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
कल समजण्यासाठीच
दहावीनंतर विद्यार्थी कुठल्या क्षेत्रात करिअर करूशकतो, याची माहिती विद्यार्थी व पालकांना व्हावी या हेतूनेच या चाचण्या घेतल्या जाणार आहेत.
कल चाचणी व प्रवेश प्रक्रिया यांचा कसलाही संबंध असणार नसून, संबंधित क्षेत्रात प्रवेशासाठी मदत केली जाणार नाही, असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.