शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

६५ कोटींच्या निविदा; चौकशीचे दिले आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 12:17 AM

खुलताबाद ते म्हैसमाळ या एमडीआरचे ३८ कोटींचे (मेजर डिस्ट्रिक्ट रोड), तर हर्सूल-जटवाडा या २७ कोटींच्या रस्ते कामांच्या निविदा अपात्र कागदपत्रांच्या आधारे मंजूर करण्याच्या हालचालींच्या तक्रारीवरून प्रधान सचिव आशिष सिंह यांनी निविदा प्रकरणात चौकशीचे आदेश दिल्याचे सचिव सी.पी. जोशी यांनी शुक्रवारी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

ठळक मुद्देमंत्रालयापर्यंत दखल : चौकशीनंतरच खरे ते बाहेर येईल

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : खुलताबाद ते म्हैसमाळ या एमडीआरचे ३८ कोटींचे (मेजर डिस्ट्रिक्ट रोड), तर हर्सूल-जटवाडा या २७ कोटींच्या रस्ते कामांच्या निविदा अपात्र कागदपत्रांच्या आधारे मंजूर करण्याच्या हालचालींच्या तक्रारीवरून प्रधान सचिव आशिष सिंह यांनी निविदा प्रकरणात चौकशीचे आदेश दिल्याचे सचिव सी.पी. जोशी यांनी शुक्रवारी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.सचिव जोशी यांनी सांगितले की, निविदांप्रकरणी प्रधान सचिवांना तक्रार प्राप्त झाली आहे. त्यांनी चौकशी करावी, असे आदेशित केले आहे. त्यांच्या आदेशानुसार त्या प्रकरणाची चौकशी होईल. २४ मे रोजीच्या अंकात ‘लोकमत’ने याप्रकरणी वृत्त प्रकाशित केल्यानंतर गुरुवारी सचिव सी.पी. जोशी यांनी वृत्ताची दखल घेतली. तसेच चौकशी समितीच्या माध्यमातून निविदांच्या कागदपत्रांची छाननी करण्याचे आदेशही त्यांनी दिले होते. गुरुवारी अधीक्षक अभियंता व टीमने रात्रभर त्या निविदांच्या कागदपत्रांची छाननी केली. त्यानंतर आता प्रधान सचिव आशिष सिंह यांनी पूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशीअंती ६५ कोटींच्या रस्ते कामांच्या निविदेतील खरे काय ते बाहेर येईल. दरम्यान, कार्यकारी अभियंता भगत राजकीय दबावामुळे १५ दिवसांच्या रजेवर गेले गेल्याने प्रभारी उपअभियंता चव्हाण यांच्याकडून ६५ कोटींच्या निविदा मंजूर करण्याच्या हालचालींना वेग आला होता. चव्हाण यांनीदेखील मंजुरीला नकार दिल्याचे वृत्त आहे.शासनाची फसवणूकझाल्याची तक्रारनिविदा प्रकरणात शासनाची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांनी संबंधित कंत्राटदारांविरोधात जीएसटी आयुक्त, आयकर विभागाकडे तक्रार द्यावी. अशी तक्रार व मागणी माजी आ. अण्णासाहेब माने यांनी निवेदनाद्वारे केली आहे. याप्रकरणी काहीच कारवाई केली नाही, तर या प्रकरणात चव्हाण आणि कंत्राटदारांच्या विरोधात पोलिसांत आणि न्यायालयात जाण्याचा इशारा माजी आ. माने यांनी निवेदनातून दिला आहे. एकूण पाच कामांच्या आॅनलाईन निविदा भरण्यात आल्या. त्यामध्ये मशिनरीची कागदपत्रे व एमओएसटी प्रमाणपत्र वेगवेगळ्या निविदेत वेगवेगळ्या कंत्राटदारांनी वापरून शासनाची फसवणूक केली आहे. त्यामुळे शासनाचा महसूल बुडाल्याचा आरोप माने यांनी निवेदनातून केला आहे. निविदांमध्ये अपात्र कागदपत्रे असल्याचे कार्यकारी अभियंता एस.एस. भगत यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी २३ मे रोजी आवक क्र. २७८७ नुसार या प्रकरणाची तातडीने दखल घेतली. निविदाप्रक्रिया थांबवून संबंधित लेखा विभागाकडून कागदपत्रांची तपासणी करण्याचे आदेश वरिष्ठ लेखाधिकारी पिंटूकुमार यांना दिले, असेही माने यांनी निवेदनात म्हटले आहे.अधीक्षक अभियंता म्हणाले...४अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, ६५ कोटींच्या प्रकरणात मंत्रालय पातळीवरून पत्र आल्याची माहिती मिळाली आहे. मी सध्या रजेवर आहे; परंतु त्या कामाची वर्कआॅर्डर झालेली नाही. चौकशीअंती जे होईल ते होईल.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकAurangabadऔरंगाबादpwdसार्वजनिक बांधकाम विभागLokmatलोकमत