६४५ जणांनी दिली पोलीस शिपाई पदाची परीक्षा
By Admin | Updated: April 16, 2017 23:44 IST2017-04-16T23:39:22+5:302017-04-16T23:44:18+5:30
जालना : जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पोलीस शिपाईच्या ४२ जागांसाठी ६४५ उमेदवारांनी परीक्षा दिली.

६४५ जणांनी दिली पोलीस शिपाई पदाची परीक्षा
जालना : जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पोलीस शिपाईच्या ४२ जागांसाठी घेण्यात आलेल्या भरती प्रक्रियेत ८०४ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले होते. त्यापैकी लेखी परीक्षेस ६४५ उमेदवारांनी परीक्षा दिली. तर १५९ उमेदवार गैरहजर होते. उमेदवारांची रविवारी सकाळी १० ते ११.३० या काळात कडक पोलीस बंदोबस्तात लेखी परीक्षा घेण्यात आली.
२२ मार्चपासून या भरती प्रक्रियेला सुरूवात झाली होती. ४२ जागांसाठी साडेपाच हजारांपेक्षा अधिक उमेदवारांनी यासाठी अर्ज केले होते. तर १२ जागा महिलांसाठी सुध्दा राखीव होत्या यासाठी ९०० महिला उमेदवारांनी सुध्दा अर्ज केले होते. उमेदवारांच्या लांबउडी, गोळाफेक, ८०० मीटर धावणे, १०० मीटर आदी मैदानी चाचणी उमेदवारांची घेण्यात आली. त्यात ८०४ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले होते. त्यापैकी रविवारी ६४५ उमेदवारांची परीक्षा घेण्यात आली.
या पात्र उमेदवार सकाळी ९.३० वाजता कवायत मैदानावर परीक्षेसाठी हजर झाले होते. यावेळी उमेदवारांच्या ओळखपत्राची कसून तपासणी करून १० वाजता परीक्षेला सुरूवात झाली. १० ते ११.३० अशी दीड तास परीक्षा घेण्यात आली. यावेळी पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर, होम डीवायएसपी अभय देशपांडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी आदी पस्थित होते. (प्रतिनिधी)