६२ ग्रामपंचायतींना मिळणार घंटागाडी
By Admin | Updated: January 5, 2015 00:36 IST2015-01-05T00:19:53+5:302015-01-05T00:36:02+5:30
जालना : जिल्हा परिषदेच्या वतीने ६२ ग्राामपंचायतींना कचरा वाहून नेण्यासाठी घंटागाडी नेण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासंबंधीचा ठराव शनिवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजुर करण्यात आला.

६२ ग्रामपंचायतींना मिळणार घंटागाडी
जालना : जिल्हा परिषदेच्या वतीने ६२ ग्राामपंचायतींना कचरा वाहून नेण्यासाठी घंटागाडी नेण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासंबंधीचा ठराव शनिवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजुर करण्यात आला.
जिल्हा नियोजन समिती (सर्वसाधारण) च्या नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत दरास मान्यता मिळण्याचा ठराव या सभेत मांडण्यात आला. तीन व चारचाकी अशा आवश्यकतेनुसान वाहनांची खरेदी त्यासाठी करण्यात येणार आहे. तीनचाकी घंटागाडीसाठी प्रत्येकी ३ लाख ११ हजार रुपये तर चारचाकी घंटागाडीसाठी प्रत्येकी ३ लाख ९८ हजार ७०० रुपयांच्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली आहे.
घंटागाडी खरेदीसंदर्भात जिल्हा परिषदेने काढलेल्या ई-टेंडरमध्ये चार एजन्सींनी सहभाग नोंदविला. मात्र त्यापैकी कमी दराच्या एका एजन्सीला मान्यता देण्यात आली. ग्रामीण भागात अनेक गावांनी स्वच्छता अभियानात क्रमांक पटकावलेला आहे.
मात्र काही ग्रामपंचायतींमध्ये आजही कचरा वाहून नेण्याची सुविधा नाही.
त्याचप्रमाणे जिल्ह्यातील अन्य ग्रामपंचायतींमध्येही ही सुविधा नसल्याने कचरा गाव परिसरातच कुठेतरी टाकला जातो.
पावसाळ्यात हाच कचरा वाहून परत गावात येतो. अशा समस्येमुळे अनेक ठिकाणी दुर्गंधी पसरून नागरिकांना विविध साथरोगांना सामोरे जावे लागते.
याबाबत गेल्या काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेने घंटागाड्यांसाठी जिल्हा नियोजन समितीने नाविन्यपूर्ण योजनेतून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. समितीने ती मान्य करून निधी उपलब्ध करून दिला.
त्यानुसार ६२ गावांमध्ये घंटागाडी खरेदी करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला.
ही वाहने खरेदी करण्यासाठी ई-निविदा काढण्यात आली. त्यात चार एजन्सींनी सहभाग नोंदविला होता. त्यापैकी कमी दराच्या एजन्सीला निश्चित करण्यात आले. (प्रतिनिधी)
जिल्हा परिषदेच्या वतीने ६२ ग्रामपंचायतींना निधी उपलब्ध करून देण्यात आला असला तरी अन्य ग्रामपंचायतींनाही टप्प्याटप्प्याने हा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती जि.प. अध्यक्ष तुकाराम जाधव यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
४स्वच्छता अभियानाच्या दृष्टीने या घंटागाड्यांचा वापर होऊन कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची सुविधा ग्रामपंचायतींना उपलब्ध करून देण्यात आल्याचेही जाधव यांनी सांगितले.