६१५ अर्ज दाखल
By Admin | Updated: January 31, 2017 23:30 IST2017-01-31T23:23:16+5:302017-01-31T23:30:58+5:30
बीड :मंगळवारपर्यंत जिल्हा परिषद गटांसाठी एकूण २३९, तर पं.स. गणांसाठी ३७६ असे एकूण ६१५ अर्ज दाखल झाले

६१५ अर्ज दाखल
बीड : जिल्हा परिषदेच्या ६० गटासाठी व १२० पंचायत समिती गणासाठी आगामी १६ फेब्रुवारीला निवडणुक होणार आहे. यासाठी शुक्र वारपासून आॅनलाईन पद्धतीने नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. मंगळवारपर्यंत जिल्हा परिषद गटांसाठी एकूण २३९, तर पं.स. गणांसाठी ३७६ असे एकूण ६१५ अर्ज दाखल झाले असल्याची माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी दिली.
जिल्ह्यात जि.प.-पं.स. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रि या सुरू झाली आहे. दरम्यान पहिल्या दोन दिवशी एकाही इच्छूकाने अर्ज दाखल केले नाहीत. मंगळवारी दिवसभरात जिल्हा परिषद गटांसाठी १९२, तर पं.स. गणांसाठी ३२६ असे ५१८ अर्ज दाखल झाले.
दरम्यान अर्ज भरण्याच्या आत्तापर्यंतच्या पाच दिवसांच्या मुदतीमध्ये एकूण ६१५ अर्ज दाखल झाले आहेत.
बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असल्याने शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल होणार आहेत. (प्रतिनिधी)