गोविंदा पथकांना साठ हजारांची बक्षिसे
By Admin | Updated: August 27, 2014 23:37 IST2014-08-27T23:27:49+5:302014-08-27T23:37:24+5:30
परभणी : २८ आॅगस्ट रोजी दहीहंडी फोड स्पर्धेचे आयोजन केले असून, विजेत्यांना ६० हजार रुपयांचे बक्षिसे ठेवली आहेत़

गोविंदा पथकांना साठ हजारांची बक्षिसे
परभणी : येथील छत्रपती हेल्थ क्लब आणि माहिती सेवा समितीच्या वतीने २८ आॅगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता कारेगाव रोडवरील सोमनाथ मंदिराजवळ दहीहंडी फोड स्पर्धेचे आयोजन केले असून, विजेत्यांना ६० हजार रुपयांचे बक्षिसे ठेवली आहेत़ या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन संयोजन समितीने केले आहे़
खा़ बंडू जाधव यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होणार असून, अध्यक्षस्थानी युवा सेनेचे डॉ़ राहुल पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून अतुल सरोदे, बालासाहेब मोहिते, डॉ़ विवेक नावंदर, तातेराव रायमले, रविराज देशमुख, श्रीनिवास जोगदंड, विशाल बुधवंत, नंदू आवचार, सोमनाथ काळे, अॅड़ संदीप भालेराव, गितेश देशमुख, सिद्धार्थ हत्तीअंबिरे आदींची उपस्थिती राहणार आहे़ प्रथम क्रमांकाच्या विजेत्या गोविंदा पथकाला ३१ हजार रुयांचे, द्वितीय २१ हजार आणि तृतीय ७ हजार रुपयांचे बक्षिस दिले जाणार आहे़ प्रा़ काकडे, प्रा़ गिरी पंच म्हणून काम पाहणार आहेत़ या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन गोपाळ कदम, देशमुख, मोहिते, अजिंक्य गोंडेस्वार, अनंत पवार, कदम, दीपक लांडे, लखन रणेर, वाघमारे, कदम, सचिन गुंडे आदींनी केले आहे.