शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरात विद्यार्थ्यांच्या सायकल चोरणारा ६० वर्षीय चोरटा अटकेत, १९ सायकल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 17:49 IST

सायकल चोरी करणारा आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात; १.१६ लाखांच्या १९ सायकली जप्त

छत्रपती संभाजीनगर: सिडको परिसरातील शाळकरी मुलांच्या सायकली चोरी करणाऱ्या एका ६० वर्षीय इसमास पोलिसांनी गुरुवारी रात्री मिसारवाडी येथे रंगेहाथ अटक केली. त्याच्याकडून १.१६ लाख रुपयांच्या १९ सायकली जप्त करण्यात आल्या आहेत. 

दि. २९ जुलै रोजी पूजा प्रधान (वय २९) यांनी आपल्या मुलाची सायकल घराबाहेरून चोरी झाल्याची तक्रार सिडको पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. दुसऱ्याच दिवशी, ३० जुलै रोजी पोलीस उपनिरीक्षक अनिल नाणेकर यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक इसम चोरीची सायकल विक्रीसाठी मिसारवाडीतील गल्लीत आला आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सदर ठिकाणी सापळा रचून २३.३० वाजता लक्ष्मण भिमराव गायके (वय ६०, रा. सावित्रीनगर, चिकलठाणा) या इसमास सायकलसह पकडले. चौकशीत त्याने सायकल चोरी केल्याची कबुली दिली. पुढील तपासात त्याच्याकडून एकूण १९ सायकली विविध ठिकाणांहून चोरी केल्याचे निष्पन्न झाले. सदर सायकली त्याने लपवून ठेवलेल्या ठिकाणी जाऊन पोलिसांनी जप्त केल्या.

मुलांसाठी, पालकांसाठी इशारासदर आरोपी शाळकरी मुलांच्या सायकलीच चोरत असल्याचे स्पष्ट झाले आहे, कारण अनेक मुले सायकल लॉक न लावता त्या सार्वजनिक ठिकाणी उभ्या ठेवतात. त्यामुळे पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आहे की, पालकांनी आपल्या मुलांना सायकल लॉक लावण्याची सवय लावावी जेणेकरून अशा चोरी टाळता येतील.

ही कारवाई पोलीस आयुक्त मा. प्रविण पवार, पो.उपआयुक्त मा. प्रशांत स्वामी व सहाय्यक पो.आयुक्त मा. सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे आणि त्यांच्या पथकातील पोलीस उप निरिक्षक अनिल नाणेकर , सफौ सुभाष शेवाळे, पोह मंगेश पवार, पोह प्रदिप दंडवते, पोअं विशाल सोनवणे, पोअं प्रदीप फरकाडे, पोअं सहदेव साबळे, पोअं अमोल अंभोरे यांनी केली.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी