़़़अन् ६० प्रवासी बालंबाल बचावले
By Admin | Updated: January 4, 2016 00:21 IST2016-01-03T23:46:50+5:302016-01-04T00:21:05+5:30
पळशी : सिल्लोड- पळशी बसचे ब्रेक निकामी झाल्याने बस औरंगाबाद- जळगाव महामार्ग ओलांडून थेट एका शेतात गेली. सुदैवाने या घटनेत एकाही प्रवाशाला इजा झाली नाही़

़़़अन् ६० प्रवासी बालंबाल बचावले
पळशी : सिल्लोड- पळशी बसचे ब्रेक निकामी झाल्याने बस औरंगाबाद- जळगाव महामार्ग ओलांडून थेट एका शेतात गेली. सुदैवाने या घटनेत एकाही प्रवाशाला इजा झाली नाही़ मात्र, जर बस रस्त्यावरील एखाद्या झाडाला धडकली असती, तर मोठा अनर्थ घडला असता़ मात्र, बसमधील ६० प्रवाशांचे दैव बलवत्तर असल्याने ते सुखरूप या अपघातातून बचावले़
सिल्लोड आगाराची बस (एमएच-२० बीएल-११००) पळशीकडून सिल्लोडकडे जात होती. केऱ्हाळा फाट्यावर प्रवासी उतरविण्यासाठी वाहकाने बेल वाजविली. त्यानंतर चालक संजय शिदाम यांनी ब्रेक मारले़ मात्र, ब्रेक लागलेच नाहीत़
यानंतर चालकाच्या लक्षात आले की, बे्रक निकामी झाले आहेत़ त्यांनी बसवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला़ मात्र, तोपर्यंत बस सरळ महामार्गाचा रस्ता ओलांडून रस्त्याच्या कडेवरील हॉटेल संभाजीच्या टेबल, खुर्च्यांना धडक देत सरळ कपाशीच्या शेतात उतरली.
त्यानंतर चालकाने गीअर कंट्रोल करून बस थांबविली अन् बसमधील ६० हून अधिक प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. विशेष म्हणजे सकाळची वेळ असल्याने हॉटेलमध्ये ग्राहक नव्हते़
नसता मोठी जीवितहानी झाली असती़ मात्र, बसच्या धडकेत केवळ खुर्च्या आणि टेबलचेच नुकसान झाले़