६० बसफेºया रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 00:26 IST2017-08-21T00:26:40+5:302017-08-21T00:26:40+5:30
शनिवारी झालेल्या पावसामुळे बसस्थानकाला तळ्याचे स्वरूप आले होते़ मध्यवर्ती बसस्थानकाच्या पाठीमागील बाजूने पाण्याचा प्रवाह बंद झाल्याने सर्व पाणी बसस्थानक आवारात साचले होते़ हे पाणी काढण्यासाठी अधिकारी-कर्मचाºयांनी मोठा घाम गाळाला लागला़

६० बसफेºया रद्द
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड:शनिवारी झालेल्या पावसामुळे बसस्थानकाला तळ्याचे स्वरूप आले होते़ मध्यवर्ती बसस्थानकाच्या पाठीमागील बाजूने पाण्याचा प्रवाह बंद झाल्याने सर्व पाणी बसस्थानक आवारात साचले होते़ हे पाणी काढण्यासाठी अधिकारी-कर्मचाºयांनी मोठा घाम गाळाला लागला़
बसस्थानक परिसरातील पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था केली नाही़ त्यामुळे थोडा पाऊस झाला तरी ठिकठिकाणी पाणी साचते़ विभागात सर्वाधिक उत्पन्न देणारे स्थानक म्हणून नांदेडची ओळख आहे़ परंतु, सुविधांच्या नावाने बोंबाबोंब आहे़ बसस्थानक परिसरात खड्डेच खड्डे आहेत़ त्याचबरोबर नाल्यांची आणि परिसरात असलेल्या चेंबर्सची नियमितपणे साफसफाई होत नसल्याने पाणी बाहेर पडण्यास अडथळे निर्माण होतात़ रविवारी पहाटे झालेल्या पावसामुळे बसस्थानकास तळ्याचे स्वरूप आले होते़ त्यामुळे सकाळी वाहतूक ठप्प झाली होती़ आगारामध्ये पाणी साचल्याने चालक, वाहकांना बसपर्यंत जाणे शक्य होत नव्हते़ पाठीमागील बाजूस असलेल्या डिझेल पंप ते मुख्य प्रवेशद्वारापर्यंत पाणीच पाणी दिसत होते़ यातून प्रवाशांना आणि चालक, वाहकांना मार्ग काढावा लागला़
बसस्थानकातील पाणी लालवाडीकडून काढून देण्यात येते़ परंतु, त्या भागातील पाण्याचा प्रवाह बंद करण्यात आल्यामुळे पाणी साचल्याचे बसस्थानक प्रमुख निम्मनवाड यांनी सांगितले़