६ नायब तहसीलदारांच्या जागा रिक्त
By Admin | Updated: May 5, 2017 00:15 IST2017-05-05T00:11:31+5:302017-05-05T00:15:06+5:30
परतूर : सहा नायब तहसीलदारांचा कारभार एका वरच आल्याने कामाचा खोळंबा होत आहे.

६ नायब तहसीलदारांच्या जागा रिक्त
परतूर : सहा नायब तहसीलदारांचा कारभार एका वरच आल्याने कामाचा खोळंबा होत आहे. दरम्यान, नायब तहसीलदारांची तात्काळ नियुक्ती करून तहसीसलचा कारभार सुधारावा, अशी मागणी होत आहे.
परतूर तहसील कार्यालयास सहा नायब तहसीलदारांची पदे आहेत. सध्या पी.पी. निकाळजे हे कार्यरत आहेत. पाचपैकी तीन नायब तहसीलदार मागील वर्षी सेवानिवृत्त झाले आहेत. यापैकी पी.के. जाधव हे औरंगाबाद येथे आयुक्त कार्यालयात प्रतिनियुक्तीवर आहेत. तर डी.डी. फुपाटे हे पदोन्नतीने तहसीलदार जालना जिल्हाधिकारी कार्यालयात गेले आहेत. त्यामुळे सहा नायब तहसीलदारांपैकी एकच नायब तहसीलदारावर सर्व कामाचा भार आहे. शेतकऱ्यांचे अनुदान, रोहयोची कामे, शालेय विद्यार्थ्यांची प्रमाणपत्र, वाळू उपशावर कारवाई आदी कामांचा बोजवारा उडाला आहे. शहरी व ग्रामीण भागातून नागरिक कामासाठी येत आहेत. मात्र, कामे करण्यासाठी नायब तहसीलदारच नसल्याने सर्व विभागातील कामांचा खोळंबा होत आहे.