६ लाखांपैकी सापडला १८ हजारांचा ऐवज
By Admin | Updated: November 6, 2014 01:35 IST2014-11-06T00:54:56+5:302014-11-06T01:35:31+5:30
चाकूर : येथील पोलिस ठाण्यातंर्गत गेल्या महिनाभरात ९ चोऱ्या झाल्या असून त्यातील केवळ ३ चोऱ्या उघडकीस आणण्यास पोलिसांना यश आले आहे़ या चोऱ्यांमध्ये ५ लाख ८० हजार ६७० रूपयांचा ऐवज लंपास झाला

६ लाखांपैकी सापडला १८ हजारांचा ऐवज
चाकूर : येथील पोलिस ठाण्यातंर्गत गेल्या महिनाभरात ९ चोऱ्या झाल्या असून त्यातील केवळ ३ चोऱ्या उघडकीस आणण्यास पोलिसांना यश आले आहे़ या चोऱ्यांमध्ये ५ लाख ८० हजार ६७० रूपयांचा ऐवज लंपास झाला असून त्यातील १८ हजार १७० रूपयांचा ऐवज मिळाला आहे़ शहरासह तालुक्यात चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून तपास मंद गतीने होत आहे़
चाकूर तालुक्यात गेल्या महिनाभरापासून चोऱ्यांचे प्रमाण वाढल्यामुळे शहरातील नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे़ गेल्या महिन्यात शहरातील आदर्श कॉलनीतील प्रा़ सिद्धेश्वर शेख यांच्या घरी चोरी होऊन सोन्याचे दागिने चोरीस गेले़ या दागिण्यांची किंमत ८७ हजार ५०० रूपये फिर्यादीत दाखविली़ परंतू, बाजार भावाने प्रा़ शेटकर यांचे दागिने ६ लाखांच्या जवळपास होते़ विशेष म्हणजे दुपारी चोरी झाली़ परंतु, याचा सुगावा लावण्यात पोलिसांना यश आले नाही़ तसेच घरणी येथील अनिल बोबडे यांचा १ लाख रूपये किंमतीचा आॅटो नळेगाव येथून चोरीस गेला़ आष्टामोडच्या पेट्रोलपंपावरून दोन टायर डिक्ससह चोरीस गेले़ तसेच चाकूर येथील राजू चव्हाण यांची १ सायकल अन्य साहित्याची चोरी झाली़ जानवळ येथून सौर उर्जेवर २ बॅटरी चोरीस गेल्या़ तर कबनसांगवी येथील धनाजी सांगवे यांच्या घरातून ९५ हजार रूपये चोरीस गेले़ कलकोटी येथील बालाजी मंदिरातून ‘श्री’चे दागिने असा ९ हजारांचा ऐवज चोरीस गेला़ या चोरींपैैकी केवळ १ सायकल व २ बॅटरी असा १८ हजार १७० रूपयांचा ऐवज जप्त करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे़ विशेष दोन बॅटऱ्या ह्या स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत़(वार्ताहर)
शहरासह तालुक्यातील चोऱ्यांच्या घटनांचा शोध घेऊन आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले नाही़ परिणामी, चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे़ परंतु, पोलिसांनी अद्यापही गस्त वाढविली नाही़ या घटनांमुळे पोलिसांची निष्क्रियता समोर येत आहे़ याशिवाय, अवैैध वाहतूक, दारूची विक्री, चंदन तस्करीचे प्रकार वाढले आहेत़ पोलिस अधीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या कडक आदेशाने मटका, जुगार बंद झाला़