शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

संकुलात ६ शासकीय अधिकारी-कर्मचारी; तरीही बँक खात्याची जबाबदारी कंत्राटी क्लर्ककडे कशी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 20:00 IST

क्रीडा घोटाळा: पोलिस तपासात गंभीर प्रश्न उपस्थित; पालकमंत्री समितीचे अध्यक्ष, विभागीय आयुक्त उपाध्यक्ष, तरी संकुलाचा निधी वाऱ्यावर

छत्रपती संभाजीनगर : अध्यक्षपदी पालकमंत्री, उपाध्यक्षपदी विभागीय आयुक्त, सदस्यपदी उपसंचालक असलेल्या क्रीडा संकुल समितीच्या कोट्यवधींचा निधी असलेल्या बँक खात्याचे बँक आयडी, पासवर्ड हर्षकुमार क्षीरसागरकडे होते. विशेष म्हणजे येथे ६ शासकीय कर्मचारी, अधिकारी असताना क्षीरसागरकडेच आयडी, पासवर्डसह बँक व्यवहाराची जबाबदारी कोणी दिली? त्याने कॅशबुक नोंदीत फेरफार केली; परंतु त्या नोंदी तपासून अंतिम सही उपसंचालक करतात, तर तेव्हाच याची शहानिशा का नाही झाली, असे गंभीर मुद्दे पोलिस तपासात उघडकीस आले आहेत. त्यामुळे या मास्टर प्लानचे दुसरे कोणी सूत्रधार असल्याचा संशय पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

२१ डिसेंबर रोजी जवाहरनगर पोलिस ठाण्यात, समितीच्या ५९.६२ कोटींच्या निधीपैकी २१.५९ कोटींचा निधी हर्षकुमारने हडपला. २०२२ मध्ये दिशा फॅसिलिताज या कंपनीकडून क्षीरसागरची संकुलाच्या दैनंदिन कामकाजासाठी नियुक्ती झाली. विशेष म्हणजे, वर्षभरातच कंपनीमध्ये बदल करत वेव मल्टि सर्व्हिसेसकडे कंत्राट देण्यात आले व त्यांनी देखील क्षीरसागरलाच या कामासाठी नियुक्त केले. बुधवारी हर्षकुमारला अटक करण्यात आली. त्यानंतरही प्राथमिक चौकशीत हा सर्व प्रकार उपसंचालक संजय सबनीस यांच्या सांगण्यावरूनच केल्याच्या ‘लेटर कॉन्स्पिरन्सी’वर तो ठाम होता.

तरीही हर्षकुमारकडेच जबाबदारी का?-विभागीय क्रीडा संकुलाच्या उपसंचालकपदाचा सबनीस यांच्याकडे प्रभारी पदभार होता. ते कामकाजानुसार ये-जा करत होते. त्याव्यतिरिक्त येथे कायमस्वरूपी शासनाकडून दोन वरिष्ठ लिपिक, एक क्रीडा अधिकारी, एक मुख्य लिपिक, दोन कनिष्ठ लिपिक आहेत.-तरीही अत्यंत उच्चपदस्थ व्यक्ती समितीवर असताना कोट्यवधींच्या निधीची जबाबदारी अचानक २०२२ मध्ये अवघ्या २१ वर्षीय कंत्राटी कर्मचारी क्षीरसागरकडे देण्यात आली.-विशेष म्हणजे बुधवारी न्यायालयात सरकारी पक्षाने बाजू मांडताना क्षीरसागरकडे समितीच्या बँक खात्याचे आयडी, पासवर्डदेखील असल्याचे सांगितले. ते कोणाकडून मिळाले, याचा तपास पोलिस करत आहेत.

हैदराबादमध्ये आई-वडिलांपासून झाला वेगळामालेगावला मामाची भेट घेतल्यानंतर हर्षकुमार आई-वडिलांसह हैदराबादला गेला होता. तेथून आई-वडिलांना मुर्डेश्वरला पाठवत तो रेल्वेने दिल्लीला गेला. तेथून तो कायदेशीर सल्लामसलत करत होता. तिथून पुढे पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला अटक केली.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी