गतवर्षीच्या तुलनेत यंदा ५८४ मि.मी.कमी पाऊस
By Admin | Updated: August 10, 2014 02:23 IST2014-08-10T01:56:16+5:302014-08-10T02:23:42+5:30
नांदेड : पावसाळा सुरु होऊन अडीच महिन्याचा कालावधी संपला तरी अद्याप समाधानकारक पाऊस पडला नाही. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सरासरी ५

गतवर्षीच्या तुलनेत यंदा ५८४ मि.मी.कमी पाऊस
नांदेड : पावसाळा सुरु होऊन अडीच महिन्याचा कालावधी संपला तरी अद्याप समाधानकारक पाऊस पडला नाही. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सरासरी ५८४ मि.मी.कमी पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यावर कोरड्या दुष्काळाचे सावट ओढावले आहे.
गतवर्षी १ जून २०१३ ते ८ आॅगस्ट २०१३ या कालावधीत जिल्ह्यात सरासरी ७३९.५८ मि.मी.पाऊस पडला होता. तर यावर्षी ८ आॅगस्टपर्यंत सरासरी केवळ १५४.९५ मि.मी.एवढा पाऊस झाला आहे. यामुळे जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न गंभीर होत असून जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही भेडसावत आहे. सन २०१२ मध्ये ८ आॅगस्टपर्यंत ३३५.९७ मि.मी.पाऊस झाला होता. जिल्ह्यात १ जून ते ३१ आॅक्टोबर पर्यंत जिल्ह्यात सरासरी वार्षक ९५५.५५ मि.मी.पाऊस पडतो. परंतु यंदा यापैकी २५ टक्केही पाऊस आजपर्यंत पडलेला नाही.
जिल्ह्यात ८ आॅगस्टपर्यंत या वर्षात तालुकानिहाय पडलेला पाऊस असा- नांदेड १६९.९८ मि.मी., मुदखेड १२९ मि.मी., अर्धापूर १५३.३५ मि.मी., भोकर १७६.९५ मि.मी., उमरी १६२.७३, कंधार १२०.२१ मि.मी., लोहा १५०.८३, किनवट १८५.५६, माहूर २००.८७, हदगांव १३६.८४, हिमायतनगर १३६.७१, देगलूर १४०.५१, बिलोली १२६.८०, धर्माबाद १७०.३३, नायगांव १४२.४० मि.मी. तर मुखेड तालुक्यात १७६.१० मि.मी.असा ८ आॅगस्टपर्यंत एकूण २४७९.२७ मि.मी. ऐवढा तर सरासरीच्या १५४.९५ मि.मी.पाऊस पडला आहे. एकूण टक्केवारीच्या १६.२२ मि.मी.ऐवढा पाऊस झाला आहे.
गतवर्षी २०१३ मध्ये नांदेड तालुका ७३५.८१ मि.मी., मुदखेड ६९४.९८ मि.मी., अर्धापूर ६६२.६२, भोकर ९२२.०८, उमरी ६७०.४१, कंधार ५४२.८०, लोहा ५१३.६४, किनवट ९६३ मि.मी., माहूर १२२५.७०, हदगांव ९०७.१३, हिमायतनगर ९८४.९४, देगलूर ५७१.१८, बिलोली ६३८.६०, धर्माबाद ५६८.६६, नायगांव ५२४.६०, मुखेड ७०७.११ असा एकूण ११८३३.२९ मि.मी.ऐवढा पाऊस पडला होता. (प्रतिनिधी)