शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
4
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
5
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
6
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
7
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
8
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
9
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
10
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
11
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
12
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
13
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
14
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
15
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
16
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
17
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
18
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
19
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
20
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
Daily Top 2Weekly Top 5

५८ कोटी ३० लाख ४६ हजार रुपये थकित बिलाची माफी

By admin | Updated: February 10, 2015 00:32 IST

लातूर : कृषी ग्राहकांवरील वीज बिलाच्या थकीत रकमेचा बोजा कमी करण्यासाठी शासनाने कृषी संजीवनी योजना २०१४ मध्ये सुरू केली आहे़ यामध्ये ४६ हजार ४३२ शेतकऱ्यांनी

लातूर : कृषी ग्राहकांवरील वीज बिलाच्या थकीत रकमेचा बोजा कमी करण्यासाठी शासनाने कृषी संजीवनी योजना २०१४ मध्ये सुरू केली आहे़ यामध्ये ४६ हजार ४३२ शेतकऱ्यांनी ३४ कोटी ८९ लाख ८८ हजार रूपयांची थकबाकी भरली असून, या शेतकऱ्यांना एकूण रकमेपैकी ५८ लाख ३० लाख ४६ हजार रुपये माफ करण्यात आल्याने दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला आधार मिळाला आहे़कृषी पंपावरील वीज बिलांच्या थकीत रकमेचा बोजा कमी करण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी संजीवनी योजना २०१४ मध्ये सुरू केली आहे़ यामध्ये ेंथकबाकीदारांसाठी मुळ रकमेच्या ५० टक्के रक्कम एकरकमी किंवा तीन मासिक हप्त्यामध्ये भरण्याची संधी महावितरणने उपलब्ध करून दिली आहे़ तर उरलेली रक्कम महाराष्ट्र शासनाच्या वतीने महावितरण विद्युत कायदा २००३ कलम ६५ प्रमाणे रोखीने आणि समप्रमाणात अनुदान स्वरूपात अदा करण्यात येईल. तसेच या योजनेमध्ये भाग घेणाऱ्या कृषी ग्राहकांचे थकीत व्याज व दंडही माफ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे़कृषी ग्राहकांसाठी १ एप्रिल २०१४ पर्यंतचा कालावधी देण्यात आला होता. त्यामध्ये वाढ करून हा कालावधी मार्च २०१५ पर्यंत करण्यात आला आहे़ लातूर परिमंडल अंतर्गत येणाऱ्या बीड, लातूर, उस्मानाबाद या तीन जिल्ह्याअंतर्गत येणाऱ्या ४६ हजार ४३२ शेतकऱ्यांनी मार्च २०१४ च्या मुळ थकबाकीच्या प्रमाणात एकूण रकमेपैकी ३४ कोटी ८९ लाख ८८ हजार रूपये मुळ थकबाकी, दंडाची रक्कम व व्याजाच्या रकमेचा भरणा केला असून, यामधून ५८ कोटी ३० लाख ४६ हजार रूपयांची माफी करण्यात आली आहे़ तसेच १ कोटी ५० लाख रूपयाची गारपीट व टंचाई माफी करण्यात आली आहे़ या रकमेचाही यात समावेश करण्यात आलेला आहे़ महावितरणच्या या अभिनव योजनेमुळे कृषीपंपाच्या ग्राहकांना दुष्काळग्रस्त परिस्थितीत मोठा आधार मिळाला आहे़ (प्रतिनिधी)कृषी ग्राहकांवरील कृषी संजीवनी योजनेअंतर्गत थकी वीज बिलाच्या रकमेचा भरणा करण्याचा राहिलेल्या ग्राहकांमध्ये ३ लाख ६३ हजार जणांचा समावेश आहे़ या ग्राहकांनी ४०१ कोटी रक्कमेचा भरणा केल्यास त्यांची ११५५ कोटी ५२ लाख ७७ हजार १९४ रूपये एवढी माफी होणार आहे़ ग्राहकांना या योजनेचा लाभ मार्चअखेरपर्यंत घेता येणार आहे. कंपनीने मुदतवाढ दिल्यामुळे अन्य शेतकऱ्यांनाही याचा फायदा घेता येणार आहे.