शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
3
"अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
4
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
5
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
6
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
7
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
8
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
9
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
10
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
11
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
12
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
13
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
14
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
15
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
16
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
17
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
18
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
19
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

विमानतळाच्या विस्तारीकरणाचे ‘टेकऑफ’, भू- संपादनासाठी ५७८ कोटींची मान्यता

By संतोष हिरेमठ | Published: November 23, 2023 6:02 PM

१३९ एकरांत होणार विस्तारीकरण : चिकलठाणा, मुकुंदवाडी, मुर्तूजापूरमधील जमीन होणार संपादित

छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तारीकरणाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. चिकलठाणा, मुकुंदवाडी, मुर्तूजापूरमधील ५६.२५ हेक्टर म्हणजेच १३९ एकरांत विस्तारीकरण होणार आहे. या विस्तारीकरणासाठी जमीन संपादित करण्यासाठी आणि त्यापोटी होणाऱ्या ५७८.४५ कोटी रुपयांच्या खर्चास शासन निर्णयाद्वारे प्रशासकीय व वित्तीय मान्यता मिळाली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून विमानतळाच्या विस्तारीकरणाची प्रतीक्षा केली जात आहे. विस्तारीकरणासाठी आधी १८२ एकर जागेच्या भूसंपादनाची प्रतीक्षा केली जात होती. जागेची मोजणीही झाली होती; परंतु नंतर १४७ एकर जागेचे भूसंपादन करण्याचा निर्णय झाला. यातील ८ एकर क्षेत्र हे भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अधिपत्त्याखालीच आहे. त्यामुळे १३९ एकर क्षेत्र संपादित करणे आवश्यक आहे. या १३९ एकर भूसंपादनासाठी निधीची प्रतीक्षा केली जात होती. अखेर निधीचा मार्ग मोकळा झाल्याने आता विस्तारीकरणाला गती मिळेल, अशी अपेक्षा आहे.

कोणत्या ठिकाणी किती भूसंपादनगावाचे नाव - संपादित होणारे क्षेत्रचिकलठाणा- ४९.१६ हेक्टरमुर्तूजापूर - ४.२५ हेक्टरमुकुंदवाडी - २.८४ हेक्टरएकूण - ५६.२५ हेक्टर (१३९ एकर)

सर्वाधिक भूसंपादन होणार चिकलठाण्यातविस्तारीकरणासाठी सर्वाधिक भूसंपादन हे चिकलठाण्यात होणार आहे. याठिकाणी ४९.१६ हेक्टर क्षेत्र संपादित होईल. तब्बल ३९१.५० कोटी रुपये या जमिनीचे मूल्यांकन आहे.

घरे, फळझाडे, विहिरी, बोअरवेल वाचणारविमानतळाच्या विस्तारीकरणासाठी १८२ एकर जागेची मागणी भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून करण्यात आली होती. त्यासाठी जागेची मोजणीही झाली होती; परंतु १८२ एकरऐवजी आता १४७ एकर जागेचे भूसंपादन होणार आहे. नागरिकांची घरे वाचविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. घरांबरोबर फळझाडे, विहिरी, बोअरवेलही वाचणार आहेत.

विमानतळाच्या विस्तारीकरणात काय-काय होणार?- चिकलठाणा विमानतळाची धावपट्टी सध्या ९ हजार ३०० फूट म्हणजेच २८३५ मीटर लांबीची आहे. विस्तारीकरणात १२ हजार फुटांची म्हणजे ३६६० मीटर लांबीची धावपट्टी होईल.- धावपट्टी विस्ताराने भविष्यात विमानतळावर मोठी कार्गो विमाने, तसेच जास्त प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या जम्बो विमानांची उड्डाणे शक्य होतील.- विमानतळावर विमानाची वाहतूक सुरळीत होण्यासाठी समांतर ‘टॅक्सी वे’ आवश्यक असते. धावपट्टीचा विस्तारासह समांतर ‘टॅक्सी वे’देखील विस्तारीकरणात होईल.- विमानांची पार्किंग व्यवस्था, नवीन इमारत

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळtourismपर्यटन