महापालिका निवडणुकीसाठी ५७५ मतदान केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 00:41 IST2017-09-14T00:41:07+5:302017-09-14T00:41:07+5:30
महापालिका निवडणुकीसाठी २० प्रभागांकरिता ५७५ मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत़ तसेच निवडणूक कामांसाठी ३० क्षेत्रीय अधिकाºयांसह ३ हजार १७० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत़ तर २९५ कर्मचारी हे राखीव राहणार आहेत़

महापालिका निवडणुकीसाठी ५७५ मतदान केंद्र
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: महापालिका निवडणुकीसाठी २० प्रभागांकरिता ५७५ मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत़ तसेच निवडणूक कामांसाठी ३० क्षेत्रीय अधिकाºयांसह ३ हजार १७० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत़ तर २९५ कर्मचारी हे राखीव राहणार आहेत़
या निवडणुकीत ७५० ते ८०० मतदारांना मतदान करण्यासाठी एक याप्रमाणे २० प्रभागांकरिता ५७५ मतदान केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे़ एका प्रभागात सरासरी २५ ते ३० मतदान केंद्र असणार आहेत़ सर्वच मतदान केंद्र हे संबंधित इमारतीच्या तळमजल्यावरचे प्रस्तावित करण्यात आले असून आवश्यक त्या ठिकाणी रॅम्पची व्यवस्था करण्यात येणार आहे़ साधारणत: ३ ते ४ प्रभागासाठी एक याप्रमाणे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत़ तसेच मनपा आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांच्या १० प्रमुख अधिकाºयांची निवडणूक सनियंत्रण समिती स्थापन केली आहे़ त्याशिवाय व्हिडीओग्राफी, सर्व्हिलन्स पथक, मीडिया सेंटर, भरारी पथकेही स्थापन करण्यात आले आहेत़ निवडणुकीसाठी ५७५ मतदान केंद्र स्थापन करताना प्रशासनाने केंद्राध्यक्ष म्हणून ६३५, मतदान अधिकारी १ हजार ९०० व चतुर्थश्रेणी कर्मचारी म्हणून ६३५ अशा एकूण ३ हजार १७० कर्मचाºयांची नियुक्ती केली आहे़