उपकेंद्रांसाठी ५७.३८ कोटी

By Admin | Updated: September 3, 2014 01:09 IST2014-09-03T01:08:25+5:302014-09-03T01:09:43+5:30

उस्मानाबाद : जिल्ह्यात नवीन सबस्टेशन उभारणी आणि अस्तित्वातील सबस्टेशनच्या क्षमता वाढीसाठी ५७.३८ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे

57.38 crores for sub-stations | उपकेंद्रांसाठी ५७.३८ कोटी

उपकेंद्रांसाठी ५७.३८ कोटी


उस्मानाबाद : जिल्ह्यात नवीन सबस्टेशन उभारणी आणि अस्तित्वातील सबस्टेशनच्या क्षमता वाढीसाठी ५७.३८ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. तालुक्यातील चिलवडी येथील ३३/११ के .व्ही. उपकेंद्राचे माजी राज्यमंत्री राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी कार्यकारी अभियंता स. दा. कसबे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता धारूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना राणाजगजितसिंह पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील वाढलेल्या सिंचन क्षमतेमुळे दिवसेंदिस विजेची मागणी वाढत आहे. सदरील मागणी लक्षात घेता काही नवीन सबस्टेशन उभारणी करणे आणि जुन्या सबस्टेशनची क्षमता वाढविण्याबाबत शेतकऱ्यांतून वारंवार मागणी होत होती. त्यानुषंगाने उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला असता त्यांनी ५७.३८ कोटी रूपयांचा निधी या कामासाठी मंजूर केला आहे. या निधीतून चिलवडी, तडवळा क., ढोराळा, डिकसळ, पिंपळगाव लि., ढगपिंपरी, चव्हाणवाडी, तलमोड, माडज व आष्टाकासार या दहा ठिकाणी नवीन उपकेंद्र उभारण्यात येणार आहेत, असे पाटील यांनी सांगितले. त्याचप्रमाणे अंंबेजवळगे, वडगाव सि., पाडोळी ना., दहिफळ, वालवड, जेवळी, लोहारा, उमरगा चौरस्ता, सलगरा, सावरगाव, बोरगाव व येवती येथील सबस्टेशनची क्षमता वाढविण्यात येणार आहे. ही कामे झाल्यानंतर संबंधित सबस्टेशनवरील शेतकरी ग्राहकांना उच्च दाबाने आणि सुरळीत विजपुरवठा होण्यास मदत होईल, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. डॉ.पद्मसिंह पाटील आणि राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नामुळेच चिलवडी येथे नवीन सबस्टेशन मंजूर झाले. ते येत्या काही दिवसांत कार्यान्वीतही होईल. त्यानंतर शेतकऱ्यांना सुरळीत आणि उच्च दाबाने विजपुरवठा होईल, चिलवडीचे उपसरपंच शाम जाधव यांनी सांगितले. कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश देशमुख, कृ.उ. बा. संचालक पोपट पाटील, माजी उपनगरध्यक्ष अमित शिंदे, सतीश दंडनाईक, सरपंच हरिश्चंद्र दिंडोरे, उपसरपंच शाम जाधव, सुर्डीचे उपसरपंच हनुमंत झांबरे, नारायण करवर, आप्पासाहेब ढोकळे, आण्णासाहेब जाधव आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: 57.38 crores for sub-stations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.