पूर्णवादी बँकेसाठी ५७ टक्के मतदान

By Admin | Updated: April 20, 2015 00:35 IST2015-04-20T00:18:00+5:302015-04-20T00:35:45+5:30

बीड : येथील पूर्णवादी नागरी सहकारी बँकेच्या ३० जागांसाठी रविवारी मतदान झाले. जिल्ह्यासह ३० केंद्रांवर एकूण ५७ टक्के मतदान झाले

57 percent polling for the full-fledged bank | पूर्णवादी बँकेसाठी ५७ टक्के मतदान

पूर्णवादी बँकेसाठी ५७ टक्के मतदान


बीड : येथील पूर्णवादी नागरी सहकारी बँकेच्या ३० जागांसाठी रविवारी मतदान झाले. जिल्ह्यासह ३० केंद्रांवर एकूण ५७ टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी व्ही. एस. जगदाळे यांनी दिली.
पूर्णवादी नागरी सहकारी बँकेच्या ३० जागांसाठी ३२ उमेदवार रिंगणात आहेत. मतदानासाठी १३ हजार ३५४ सभासद पात्र होते. रविवारी झालेल्या निवडणुकीत यापैकी ७ हजार ६४५ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. बीड शहरातील चंपावती शाळा येथे दहा केंदे्र होते. औरंगाबाद, जालना, आष्टी, कडा, माजलगाव, शिरूर, परळी, चौसाळा, अंबाजोगाई, लातूर या ठिकाणी २० मतदान केंद्रे होती. सदरील बँकेच्या निवडणुकीसाठी एकूण ३० केंद्रे होती. मतदान सुरू झाल्यापासून संपेपर्यंत कोणत्याही केंद्रावर गोंधळ झाला नाही. निवडणूक प्रक्रियेत अडथळा निर्माण होऊ नये यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त तयार करण्यात आला होता. सहकार विभागाचे २०० कर्मचारी या निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आले होते. सहायक निवडणूक अधिकारी आर. एस. ठोसर, झोन आॅफिसर सुनील जाधव, आर. एम. मोटे, ए. ए. झळके यांनी निवडणुकीचे काम पाहिले. डॉ. अरूण निरंतर यांच्या पॅनलचे १५, परिवर्तन पॅनलचे १५ तर अपक्ष म्हणून विद्यमान संचालक विनायक वैद्य, भाजपा शहराध्यक्ष जगदीश गुरखुदे हे निवडणुकीच्या आखाड्यात होते. रविवारी मतदान शांततेत पार पडले असून एकूण ५७ टक्के मतदान झाले आहे. मंगळवारी सकाळी ९ वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात होणार आहे. चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 57 percent polling for the full-fledged bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.