५६ उमेदवार निवडणूक आखाड्यात

By Admin | Updated: October 2, 2014 00:36 IST2014-10-02T00:31:54+5:302014-10-02T00:36:13+5:30

उस्मानाबाद : उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच बुधवारी निवडणूक आखाड्यातून ५० टक्के उमेदवारांनी माघार घेतली आहे.

56 candidates in election area | ५६ उमेदवार निवडणूक आखाड्यात

५६ उमेदवार निवडणूक आखाड्यात


उस्मानाबाद : उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच बुधवारी निवडणूक आखाड्यातून ५० टक्के उमेदवारांनी माघार घेतली आहे.चार विधानसभा मतदारसंघात मिळून ५६ उमेदवार सध्या निवडणूक रिंगणात उभे आहेत. एकूणच चारही विधानसभा मतदारसंघात निवडीचे चित्र स्पष्ट झाले आहे.
भूम-परंडा-वाशी या विधानसभा मतदार संघातून आठ जणांनी उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे प्रमुख पक्षांसोबतच अपक्ष मिळून दहाजण निवडणूक रिंगणात उरले आहेत. तुळजापूर मतदार संघातूनही ३१ पैकी १८ जणांची मनधरणी करण्यात यश आले आहे. यांनी निवडणुकीच्या आखाड्यातून काढता पाय घेतल्याने आता तेराजण रिंगणात उरले आहेत. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांनी अपक्ष म्हणून निवडणुकीच्या आखाड्यात उडी घेतली होती. त्यांची मनधरणी करण्याचे काम मागील तीन-चार दिवसांपासून सुरु होते. अखेर श्रेष्ठींच्या प्रयत्नाला यश आले असून, धुरगुडे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जीवनराव गोरे यांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांच्यासाठी ही जमेची बाजू ठरणार असल्याचे बोलले जात आहे. उमरगा विधानसभा मतदार संघातूनही ११ जणांनी माघार घेतली आहे. त्यामुळे निवडणूक आखाड्यामध्ये केवळ १३ जण उरले आहेत. जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघामध्ये अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेल्यांची संख्या मोठी असल्याने याचा नेमका कोण-कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला फटका बसतो हेही पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. (प्रतिनिधी)
महेंद्र भानुदास धुरगुडे, गणेश रामचंद्र सोनटक्के, महानंदा गजानन पैलवान, अशोक हरिदास जगदाळे, सत्यवान नागनाथ सुरवसे, विजय सुधाकर शिंगाडे, डॉ. गोविंद विश्वनाथ कोकाटे, अ‍ॅड. विनयकुमार दिनकर नकाते, नवनाथ दशरथ उपळेकर, बालाजी प्रभाकर पवार, संतोष बालाजी राठोड, कृष्णा देवानंद रोचकरी, संतोष ज्ञानोबा केंदळे, खतीब तन्वीर अली सय्यद अली, कानिफनाथ दुल्हाजी देवकुळे, नामदेव धर्मा राठोड या १६ जणांनी माघार घेतली. तर ३० सप्टेंबर रोजी अतुल नवनाथ जवान व सुचेता जीवनराव गोरे या दोघाजणांनी नामनिर्देशनपत्रे मागे घेतली.
परंडा विधानसभा मतदार संघातून अमेय बाळासाहेब पाटील, गोरख भोरे, बजरंग ताटे, मुलानी अमीर, वैशाली मोटे, सूर्यकांत कांबळे, संजीवकुमार बनसोडे, हावरे करीम युसूफ यांनी माघार घेतली आहे. तर संगीता बालाजी आगवणे ( बहुजन समाज पार्टी), गणेश दत्तात्रय शेंडगे (मनसे), चौधरी नुरोद्दीन (काँग्रेस आय), ज्ञानेश्वर पाटील (शिवसेना), राहुल मोटे (राष्ट्रवादी), राजगुरु त्रिंबक कुकडे ( हिंदुस्थान जनता पार्टी), आर्यनराजे शिंदे (अपक्ष), प्रबुद्ध साहेबराव अहिरे (अपक्ष), शिंदे संभाजी नानासाहेब (अपक्ष) हे निवडणूक रिंगणात राहिले आहेत.
उमरगा मतदार संघातून प्रज्ञावर्धन भगवान कांबळे, जि.प. सदस्य हरिश डावरे, सुनिल वामनराव सूर्यवंशी, जितेंद्र उर्फ जितेश चौगुले, ईश्वर मल्हारी क्षीरसागर, दिलीप साहेबराव तेलंग, लक्ष्मण तुकाराम कांबळे, राम सैदा गायकवाड, विलास शरप्पा व्हटकर, तानाजी वैजनाथ गायकवाड उमेदवारी अर्ज वैध ठरलेल्या उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्र मागे घेतले आहे.
उस्मानाबाद मतदारसंघातून बाबू चव्हाण , अर्चना पाटील, केरबा गाढवे , तांबोळी फेरोज, धनंजय पाटील, सुशिलकुमार पाडूळे, भिमा जाधव, रजियोद्दीन आरेफोद्दीन, रामजिवन बोंदर, संजयकुमार वाघमारे, अ‍ॅड.वाजेद सलिम शेख, शिवाजी दिंगबर उर्फ पांडुरंग कापसे, सय्यद समीर रशीद, ज्ञानदेव हौसलमल, डॉ. स्मिता शहापूरकर या उमदेवारांनी विधानसभा निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे.

Web Title: 56 candidates in election area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.