५५० शेतकऱ्यांना प्रतीक्षा !

By Admin | Updated: December 22, 2014 01:02 IST2014-12-22T00:52:47+5:302014-12-22T01:02:00+5:30

बाळासाहेब जाधव , लातूर चालू वर्षात झालेले अल्प पर्जन्यमान, उशिरा झालेली पेरणी. यामुळे जिल्ह्यातील २१४४ शेतकऱ्यांचे सोयाबीन उगवलेच नाही़ परिणामी, नुकसानभरपाईची मागणी केलेल्या

550 farmers wait! | ५५० शेतकऱ्यांना प्रतीक्षा !

५५० शेतकऱ्यांना प्रतीक्षा !



बाळासाहेब जाधव , लातूर
चालू वर्षात झालेले अल्प पर्जन्यमान, उशिरा झालेली पेरणी. यामुळे जिल्ह्यातील २१४४ शेतकऱ्यांचे सोयाबीन उगवलेच नाही़ परिणामी, नुकसानभरपाईची मागणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी ४३० शेतकऱ्यांना शासनाने ७ लाख ८० हजार रुपयाचे अनुदान तीन महिन्यांत वाटप केलेले आहे़ तर उर्वरित शेतकरी मात्र अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत़
२०१४ मध्ये झालेले अल्प पर्जन्यमान, उशिरा झालेले पाऊस यामुळे जिल्हाभरातील २१४४ शेतकऱ्यांचे सोयाबीन उगवलेच नाही़ त्या झालेल्या नुकसानभरपाईची मागणी शेतकऱ्यांनी कृषी भागाकडे केली़ कृषी विभागाने यासंबंधीचा अहवाल जमा करुन कृषी आयुक्त पुणे यांच्याकडे अहवाल पाठविला़
परिणामी, शासनाच्या वतीने शेतकऱ्यांच्या प्रश्नाची दखल घेऊन शासनाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्याबदल्यात दुसरी बॅग किंवा अनुदान स्वरुपात मदत देण्याचे आदेश शासनाच्या वतीने संबंधित कंपन्यांना देण्यात आले़ यामध्ये महाबीजच्या वतीने ५ हजार रुपये, कृषीधन ५० हजार, साई ४० हजार, यशोदा ३८ हजार, महागुजरात ६० हजार, जानकी १९ हजार, ग्रीनगोल्ड ९९ हजार, कनक ६५ हजार, ईगल १ लाख ११ हजार, अंकुर ५ हजार, मार्मअ‍ॅग्री २१ हजार, रापझिंगसन १ लाख २ हजार, ममता ७ हजार, कृषीरत्न १ लाख २ हजार, टाटा केमिकल्स ७३ हजार, ग्रीन गोल्ड १३ हजार अशा एकूण ४३० शेतकऱ्यांना काही कंपन्यांनी दुसऱ्या बॅगचे वाटप केले़ तर काही कपंन्यांनी ७ लाख ८० हजार अनुदानाचे वाटप केले आहे़ परंतु यामध्ये दोषी निघालेल्या बियाणे कंपनीकडून १ हजार लाभार्थी शेतकऱ्यापैकी फक्त ४३० शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिल्याने उर्वरित शेतकरी मात्र अद्यापही अनुदानाच्या प्रतिक्षेत आहेत़ ४
जिल्ह्यातील सोयाबीन बियाणाच्या बॅग विक्री करणाऱ्या एकूण कंपन्यांपैकी १६ कंपन्यांने एकूण लाभार्थ्यांपैकी काही लाभार्थ्यांना बॅग किंवा पैशाच्या स्वरुपात अनुदानाची मदत दिली आहे़ तर तीन कंपन्यांनी मोजकेच लाभार्थी असताना एकाही लाभार्थ्यांना नुकसान भरपाई अनुदान दिलेले नाही़

Web Title: 550 farmers wait!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.