शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम ५५ टक्के; जॅकवेल, मुख्य जलवाहिन्यांच्या कामांनी घेतली गती

By मुजीब देवणीकर | Updated: November 2, 2023 16:05 IST

शहरात नवीन जलकुंभ उभारण्यासाठी कामगार मिळत नसल्याने कंत्राटदार कंपनीने आंध्र प्रदेश येथून मजूर आणले आहेत.

छत्रपती संभाजीनगर : शहराची लोकसंख्या २०५० मध्ये किती राहील, हे गृहीत धरून २७४० कोटी रुपये खर्च करून नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. अनेक अडथळ्यांनंतर योजनेच्या विविध कामांनी आता चांगलीच गती घेतली आहे. आतापर्यंत योजनेचे ५५ टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महापालिका अधिकाऱ्यांनी दिली. याच गतीने काम सुरू राहिल्यास डिसेंबर २०२४ मध्ये योजना पूर्ण होण्याची शक्यता आहे.

केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, महापालिका प्रशासक जी. श्रीकांत वारंवार याेजनेचा आढावा घेत आहेत. जायकवाडी धरणात जॅकवेल उभारण्यासाठी कॉफरडॅम उभारण्याचे काम जवळपास पूर्ण झाले. पुढील काही महिन्यांत सिमेंटच्या भिंती उभारण्याचे काम सुरू होईल. धरणाच्या पायथ्याशी खडक लागल्याने ब्रेकरच्या साह्याने काम सुरू करण्यात आले. या ठिकाणी ब्लास्टिंगला परवानगी नसल्याने खडक फोडण्यासाठी यंत्रणा वाढविण्यात आली. त्याचप्रमाणे जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत २५०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्यात येत आहे. दररोज दोन ते तीन जलवाहिन्यांना वेल्डिंग केली जात होती. आता हे प्रमाण तब्बल ७ पर्यंत नेण्यात आले. त्यामुळे २२ किमीपेक्षा अधिक अंतरावर जलवाहिनीचे काम पूर्ण झाले. पुढील ८ किमीसाठी पाइपही आणून ठेवण्यात आले. काही ठिकाणी मनपाच्या ७०० आणि १४०० मिमी व्यासाच्या जलवाहिन्यांचा अडथळा येतोय. किंचितही धक्का लागला तर दोन्ही वारंवार फुटून शहराचा पाणीपुरवठा ठप्प होत असल्याने अत्यंत सावधगिरीने काम करावे लागत असल्याचे कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक महेंद्र गोगलोतू यांनी सांगितले.

शहरात १८०० किमीच्या जलवाहिन्याशहरामध्ये १८०० किमीच्या जलवाहिन्या टाकायच्या आहेत. त्यालाही गती दिली असून, दररोज दोन ते अडीच किमी. जलवाहिन्या टाकण्यात येत आहेत. नक्षत्रवाडी येथे सहा जलशुद्धीकरण केंद्रे आहेत. त्यांतील तीन पूर्ण झाली असून, उर्वरित केंद्रांचे काम जवळपास ६० टक्के पूर्ण झाले.

मनपाचे जलकुंभाकडे लक्षनवीन पाणीपुरवठा योजनेत तयार करण्यात आलेले जलकुंभ हस्तांतरण करून घेणे, त्याचा त्वरित वापर सुरू करण्यावर मनपा प्रशासनाने भर दिला आहे. उन्हाळ्यापूर्वी ९०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीचे काम पूर्ण येईल. शहरात अतिरिक्त ७५ एमएलडी पाणी येईल. तूर्त ७०० मिमीची जुनी जलवाहिनी काही दिवस सुरू ठेवण्याचा मानस प्रशासक जी. श्रीकांत यांनी व्यक्त केला.

११ जलकुंभांची कामे अंतिम टप्प्यातशहरात नवीन जलकुंभ उभारण्यासाठी कामगार मिळत नसल्याने कंत्राटदार कंपनीने आंध्र प्रदेश येथून मजूर आणले आहेत. ११ जलकुंभांची कामे अंतिम टप्प्यात असून, आंध्र प्रदेशातील मजुरांकडून रखडलेल्या जलकुंभांची कामे सुरू करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता दीपक कोळी यांनी नमूद केले की, ४० मजुरांची पहिली तुकडी दाखल झाली आहे. त्यामुळे तीन जलकुंभांची कामे लगेचच सुरू होतील.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी