५५ सायकलींचे मालक सापडेनात !
By Admin | Updated: August 28, 2016 00:18 IST2016-08-28T00:11:42+5:302016-08-28T00:18:53+5:30
लातूर : शहर व जिल्ह्यातील विविध शाळा-महाविद्यालय आणि खासगी कोचिंग क्लासेसच्या परिसरात पार्किंग करण्यात आलेल्या सायकली चोरणाऱ्या टोळीतील एकास गंगापूर

५५ सायकलींचे मालक सापडेनात !
लातूर : शहर व जिल्ह्यातील विविध शाळा-महाविद्यालय आणि खासगी कोचिंग क्लासेसच्या परिसरात पार्किंग करण्यात आलेल्या सायकली चोरणाऱ्या टोळीतील एकास गंगापूर येथून शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या ५५ सायकलींच्या मालकांचा शोध अद्यापही लागला नाही़ पाच दिवसानंतरही सायकलींचा तिढा सुटला नाही.
लातूर तालुक्यातील गंगापूर येथील अतुल वलसे या चोरट्याकडून शिवाजीनगर पोलिसांनी तब्बल ५५ सायकली जप्त केल्या़ मात्र, सायकल चोरणाऱ्या टोळीचा म्होरक्या पोलिसांच्या हाती लागला नाही. विशेष म्हणजे, चोरीतील ५५ सायकलींची विक्री एकाच गावात करण्यात आली आहे़ जिल्ह्यात शेकडोंच्या संख्येने सायकलींची त्या-त्या पोलिस ठाण्यात हद्दीत चोरी झाली आहे. जिथे गंभीर गुन्ह्यांची पोलिसांकडून दखल घेतली जात नाही, तिथे आपल्या सायकलींची दखल पोलिस घेणार का? याबाबत तक्रारदारांच्या मनात संशय असल्यामुळे ते पुढे येत नाहीत़ सायकल चोरीच्या घटना किरकोळ बाब म्हणून पोलिसांचे दुर्लक्ष होते़ त्यामुळे या चोरट्यांचे मनोबल वाढत आहे़