जिल्हा बँकेसाठी ३८ जणांचे ५५ अर्ज
By Admin | Updated: April 8, 2015 00:51 IST2015-04-08T00:37:54+5:302015-04-08T00:51:24+5:30
लातूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १९ संचालक मंडळासाठी ५ मे ला मतदान होत आहे़ त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हा उपनिबंधकांकडे गर्दी होत आहे़

जिल्हा बँकेसाठी ३८ जणांचे ५५ अर्ज
लातूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १९ संचालक मंडळासाठी ५ मे ला मतदान होत आहे़ त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हा उपनिबंधकांकडे गर्दी होत आहे़ मंगळवारी ११ जणांनी १३ अर्ज दाखल केले असून, आतापर्यंत ३८ जणांनी ५५ अर्ज दाखल केले आहेत़
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ८ एप्रिल अंतिम तारीख आहे़ बुधवारी अखेरचा दिवस असून आतापर्यंत आ़दिलीपराव देशमुख, आ़बाबासाहेब पाटील, अशोक गोविंदपूरकर, विश्वंभरराव माने, सुग्रीव लोंडे, सर्जेराव मोरे, नागनाथ पाटील, श्रीपतराव काकडे, विठ्ठलराव माकणे, पृथ्वीराज सिरसाठ, सुनिता आरळीकर, शिवकन्या पिंपळे, स्वयंप्रभा पाटील, श्रीशैल्य उटगे, वामनराव पाटील, शिलाताई पाटील, माजी आ़चंद्रशेखर भोसले, अशोक पाटील निलंगेकर आदींनी सोमवारीच उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत़ बुधवारी ११ जणांनी १३ अर्ज दाखल केले आहेत़ दरम्यान, भारतीय जनता पार्टीकडून मंगळवारी उमेदवारी दाखल झाली नव्हती़ (प्रतिनिधी)