‘एकनाथ’साठी ५३.८३ टक्के मतदान

By Admin | Updated: July 1, 2016 00:32 IST2016-07-01T00:22:38+5:302016-07-01T00:32:47+5:30

पैठण : संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी गुरुवारी ५३.८३ टक्के मतदान झाले. १३ हजार ९१३ मतदारांपैकी ७ हजार ४८८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला

53.83 percent polling for 'Eknath' | ‘एकनाथ’साठी ५३.८३ टक्के मतदान

‘एकनाथ’साठी ५३.८३ टक्के मतदान


पैठण : संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी गुरुवारी ५३.८३ टक्के मतदान झाले. १३ हजार ९१३ मतदारांपैकी ७ हजार ४८८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ७७ मतदार असलेल्या सोसायटी मतदारसंघात १०० टक्के मतदान झाले.
गुरुवारी सकाळी ८ वाजता तालुक्यातील ३१ मतदान केंद्रांवर मतदानास सुरुवात झाली. सकाळच्या सत्रात संथगतीने मतदान झाले. मात्र, दुपारी २ वाजेनंतर मतदानाने वेग घेतला. मतदान संपण्याच्या निर्धारित वेळेत एकूण मतदानापैकी ७ हजार ४८८ मतदारांनी मतदान केले.
निवडणुकीत आमदार संदीपान भुमरे यांच्या शेतकरी कामगार विकास पॅनल व भाजप तालुकाध्यक्ष तुषार शिसोदे, माजी आमदार संजय वाघचौरे, माजी चेअरमन अप्पासाहेब रामकृष्ण पाटील यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनलमध्ये चुरशीची लढत होत आहे. सकाळपासून आमदार संदीपान भुमरे हे आपल्या समर्थकांसह पैठण येथील मतदान केंद्रावर तळ ठोकून होते. त्यांच्या सोबत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रवींद्र काळे, नगराध्यक्ष दत्ता पा. गोर्डे, विष्णू मिटकर, जिल्हा उपप्रमुख विनोद पा. बोंबले, तालुकाप्रमुख अण्णासाहेब लबडे, नंदलाल काळे, प्रल्हाद औटे, राम एरंडे, श्याम जगताप, तुषार पाटील, शहरप्रमुख प्रकाश वानोळे, नाथ पोरवाल, दिलीप मगर, दादा बारे, शिवराज पारीख आदी होते.
परिवर्तन पॅनलकडून माजी आमदार संजय वाघचौरे, भाजप तालुकाध्यक्ष तुषार शिसोदे, जितसिंग करकोटक, माजी चेअरमन अप्पासाहेब रामकृष्ण पाटील, उपनगराध्यक्षा रेखाताई कुलकर्णी, रफिक कादरी, आबा बरकसे, सुनील रासणे, हे मतदान करून घेत होते. मतदानाच्या कालावधीत तालुक्यातील कोणत्याही मतदान केंद्रावर अनुचित प्रकार न घडता मतदान शांततेत पार पडले. उद्या शुक्रवारी येथील आशीर्वाद मंगल कार्यालयात सकाळी मतमोजणीस सुरुवात होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.
पैठण - ३१८, आखतवाडा - २२५, वडवाळी - २७८, आनंदपूर - १९९, पिंपळवाडी - ३५६, वाहेगाव - ३६१, चांगतपुरी - २५७, चनकवाडी -१९१, पाटेगाव - २४९, दावरवाडी - १८७, विहामांडवा - ३०४, नवगाव - ३६०, नांदर - १९१, दादेगाव हजारे - २३२, टाकळी अंबड - ३४१, आपेगाव - २५५, कडेठाण - २२२, पाचोड - २३४, आडूळ - १८४, निलजगाव - १७४, चितेगाव - १९५, बिडकीन - १७२, रांजणगाव खुरी - १७०, कौडगाव - १८०, बालानगर- २८०, ढाकेफळ - ३२५, ढोरकीन - ३००, धनगाव - १९५, लोहगाव - २५३, कारकीन - २२३ व सहकारी संस्था प्रतिनिधी मतदारसंघात ७७ पैक ी ७७.
पाचोड : संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या आज झालेल्या निवडणुकीत पाचोड परिसरात ८ केंद्रांवर फक्त ४९.४९ % टक्के मतदान झाले आहे. आज सकाळी पाचोड गावासह परिसरातील आडूळ, कडेठाण, टाकळी अंबड, दादेगाव हजारे, नांदर, विहामांडवा, दावरवाडी या गावांत सकाळी शांततेत मतदानास सुरुवात झाली. पैठणचे आ. भुमरे, विलास भुमरे, राजू भुमरे यांनी पाचोड येथे मतदानाचा हक्क बजावला. यानंतर आ. भुमरे यांनी विविध मतदान केंद्रांला भेटी दिल्या. स.पो. अधीक्षक बच्चनसिंह, स.पो.नि. महेश आंधळे यांनी पाचोड परिसरात आठही मतदान केंद्रांना भेटी दिल्या. पाचोड पोलिसांनी सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवला होता. कोठेही अनुचित प्रकार घडला नाही.

Web Title: 53.83 percent polling for 'Eknath'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.