५२५ बसेसची चाके थांबली

By Admin | Updated: December 18, 2015 00:02 IST2015-12-17T23:54:13+5:302015-12-18T00:02:18+5:30

नांदेड : एसटी कर्मचाऱ्यांना २५ टक्के पगारवाढ करावी, यासह विविध ११ मागण्यांसाठी गुरूवारी इंटकने पुकारलेल्या संपात विभागातील जवळपास अडीच हजार कर्मचारी सहभागी झाले़

525 buses stopped | ५२५ बसेसची चाके थांबली

५२५ बसेसची चाके थांबली

नांदेड : एसटी कर्मचाऱ्यांना २५ टक्के पगारवाढ करावी, यासह विविध ११ मागण्यांसाठी गुरूवारी इंटकने पुकारलेल्या संपात विभागातील जवळपास अडीच हजार कर्मचारी सहभागी झाले़ कोणत्याच आगारातून बस बाहेर न पडल्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली़
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कामगारांच्या पगारवाढीच्या झालेल्या करारात त्रुटी असून अनेक प्रश्न प्रलंबित ठेवले आहेत़ यासंदर्भात इंटकने अनेकवेळा पाठपुरावा करून देखील एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने गुरूवारी संप पुकारला़ बहुतांश प्रवाशांना संप असल्याचे माहिती नसल्याने बसस्थानकापर्यंत येवून पुन्हा परतावे लागले़ संपामुळे प्रवाशांचे हाल झाले़ नांदेड आगारातून पहाटे ४़१५ वाजता नांदेड - सोलापूर ही पहिली बस आगारातून बाहेर पडते़ मात्र पहाटे चारपासूनच कर्मचाऱ्यांनी संप सुरू केल्याने दिवसभरात एकही बस बाहेर पडली नाही़
एमएसईबी कामगारांप्रमाणे २५ टक्के पगारवाढ मिळविण्याकरीता औद्योगिक कलह कायदा १९४७ मधील तरतुदीनुसार कामगार करार रद्द करण्यात यावा व एमएसईबीप्रमाणे २५ टक्के पगारवाढ द्यावी, १ एप्रिल २०१२ नंतर कनिष्ठ वेतनश्रेणीतून नियमित वेतनश्रेणीत येताना कराराचा फायदा दिलेला नाही, तो देवून वेतन निश्चिती करावी यासह ११ मागण्या इंटकने केल्या आहेत़ आंदोलनात इंटकचे विभागीय सचिव पी़ आऱ इंगळे, के़ एस़ दुर्गे, जी़ एस़ सोनटक्के, एच़ जी़ सोनटक्के, बाळासाहेब मोरे, एस़ के़ शिराळे, मारोती घोरबांड, सिद्धार्थ जोंधळे यांनी सहभाग नोंवदला़
दरम्यान, मागण्यांसंदर्भात गुरूवारी रात्री उशिरापर्यंत कोणताच तोडगा निघाला नसल्याने शुक्रवारी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच राहील, अशी माहिती इंटकचे विभागीय सचिव पी़ आऱइंगळे यांनी ‘लोकमत’ला दिली़

Web Title: 525 buses stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.