आॅनलाईनद्वारे ५२०५ दुकानांची नोंदणी, नूतनीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 00:12 IST2017-08-06T00:12:39+5:302017-08-06T00:12:39+5:30
१५ आॅक्टोबर २०१५ पासून दुकान नोंदणीची कामे आॅनलाईन करण्यात आली आहेत. आॅनलाईन प्रणालीद्वारे आतापर्यंत ५ हजार २०५ जणांनी दुकान नोंदणी व नूतनीकरण केले आहे. पुर्वी कार्यालयासमोरील रांगा आता इंटरनेटकॅफे किंवा महा-ईसेवा केंद्रावर दिसून येत आहे.

आॅनलाईनद्वारे ५२०५ दुकानांची नोंदणी, नूतनीकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : १५ आॅक्टोबर २०१५ पासून दुकान नोंदणीची कामे आॅनलाईन करण्यात आली आहेत. आॅनलाईन प्रणालीद्वारे आतापर्यंत ५ हजार २०५ जणांनी दुकान नोंदणी व नूतनीकरण केले आहे. पुर्वी कार्यालयासमोरील रांगा आता इंटरनेटकॅफे किंवा महा-ईसेवा केंद्रावर दिसून येत आहे.
हिंगोली येथील सरकारी कामगार अधिकारी यांच्या कार्यालयातील दुकाने नोंदणी आस्थापना विभागा अंतर्गत नगर पालिकेच्या हद्दीतील दुकानांच्या नोंदी ठेवल्या जातात. वसमत, हिंगोली, कळमनुरी व जिंतूर नगर परिषद हद्दीतील कार्यक्षेत्रातील दुकाने नोंदणी व नूतनीकरण येथील कार्यालय अंतर्गत केली जाते. पुर्वी सरकारी कामगार अधिकारी यांचे कार्यालयात दुकान नोंदणीसाठी अर्ज तसेच नुतकनीकरण करून दिले जात असे. परंतु सदर कामे आता आॅनलाईन झाल्याने दुकान चालक व मालकांना कार्यालया ऐवजी थेट नेटकॅफे किंवा महा-ई-सेवा केंद्रावर धाव घ्यावी लागत आहे. शिवाय या कामात आॅनलाईनमुळे पारदर्शकता आल्याची माहिती कार्यालयाकडून देण्यात आली. परंतु अनेक दुकान चालकांना याबाबत माहिती नसल्याने त्यांची लुट होत असल्याचे चित्र आहे. शासनाच्या सूचनेनुसार प्रत्येक दुकानाची नोंदणी करणे अनिवार्य आहे. ज्या दुकान चालकांनी नोंदणी किंवा वेळेत नूतनीकरण केले नाही, त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. परंतु मागील अनेक वर्षांपासून येथील कार्यक्षेत्रात अद्यापही कार्यवाही झाली नाही. आयुक्तांनी घेतला आढावा
११ जुलै रोजी हिंगोली येथील सरकारी कामगार अधिकारी कार्यालयास सहाय्यक आयुक्त बी. एम. मोरडे यांनी भेट घेऊन कार्यालयीन कामांचा आढावा घेतला. तसेच कार्यरत अधिकारी व कर्मचाºयांना आवश्यक सूचना यावेळी त्यांनी दिल्या होत्या.