२१ जागांसाठी ५२ जण रिंंगणात
By Admin | Updated: March 27, 2015 00:23 IST2015-03-27T00:23:13+5:302015-03-27T00:23:13+5:30
परळी : येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदाच्या २१ जागांसाठी २६ एप्रिल रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी गुरूवारपर्यंत ५२ जणांची उमेदवारी दाखल झाली आहे

२१ जागांसाठी ५२ जण रिंंगणात
परळी : येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदाच्या २१ जागांसाठी २६ एप्रिल रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी गुरूवारपर्यंत ५२ जणांची उमेदवारी दाखल झाली आहे. मंत्री पंकजा मुंडे यांनी गुरूवारी स्वत:सह पॅनलचे नामनिर्देशन पत्र दाखल केले.
निवडणूक निर्णय अधिकारी महेंद्र कांबळे यांच्याकडे नामनिर्देशन पत्र सादर केले. यावेळी आ. आर. टी. देशमुख, आ. भीमराव धोंडे, अॅड. यशश्री मुंडे, फुलचंद कराड, नामदेवराव आघाव, बाबूराव पोटभरे, रमेश पोकळे, जि. प. सदस्या गयाबाई कराड, संतोष हंगे, दशरथ वनवे उपस्थित होते.
वैद्यनाथ कारखान्यावरील हुकूमत अबाधित ठेवण्यासाठी मंत्री पंकजा यांनी परळी मुक्कामी व्यूहरचना आखली आहे. विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी देखील भाजपच्या वर्चस्वाला सुरूंग लावण्यासाठी डावपेच आखले आहेत. (वार्ताहर)