मर्चन्टस बँक निवडणुकीसाठी ५१.७५ टक्के मतदान

By Admin | Updated: May 6, 2015 00:28 IST2015-05-06T00:17:48+5:302015-05-06T00:28:48+5:30

मर्चन्टस बँक निवडणुकीसाठी ५१.७५ टक्के मतदान

51.75 percent polling for merchants bank elections | मर्चन्टस बँक निवडणुकीसाठी ५१.७५ टक्के मतदान

मर्चन्टस बँक निवडणुकीसाठी ५१.७५ टक्के मतदान


जालना : जालना मर्चन्टस को. आॅप. बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी ५१.७५ टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक अशोक खरात यांनी दिली. बुधवारी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.
मोतीराम अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील सहकार विकास पॅनल व सीए गोविंदप्रसाद मुंदडा यांच्या नेतृत्वाखालील व्यापारी एकता पॅनल या दोन्ही प्रतिस्पर्धी पॅनलमध्ये चुरशीची लढत झाली. या निवडणुकीसाठी जेईएस महाविद्यालयातील १४ तसेच भोकरदन व अंबड येथील प्रत्येकी एक अशा एकूण १६ केंद्रांवर मतदान प्रक्रिया घेण्यात आली. सर्व ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. एकूण ५ हजार ८७८ पैकी ३ हजार ४२ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. सकाळी १० ते १२ या वेळेत ८२३ जणांनी मतदान केले. सकाळी ८ ते १० व दुपारी १२ ते २ या वेळेतही मतदारांची संख्या ६०० ते ७०० च्या जवळपास होती. मतदान संपण्याच्या अखेरच्या तीन तासांत मात्र मतदारांची संख्या कमी होती. (वार्ताहर)

Web Title: 51.75 percent polling for merchants bank elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.