अणुजीव तपासणीत २ महिन्यांत ५०४ नमुने आढळले दूषित
By Admin | Updated: December 9, 2015 23:48 IST2015-12-09T23:33:23+5:302015-12-09T23:48:40+5:30
गजेंद्र देशमुख , जालना जिल्ह्यात गत दोन महिन्यांत जिल्हा आरोग्य प्रयोग शाळेने केलेल्या अणुजीव पाणी तपासणीत तब्बल ५०४ नमुने दूषित आढळून आले आहेत.

अणुजीव तपासणीत २ महिन्यांत ५०४ नमुने आढळले दूषित
गजेंद्र देशमुख , जालना
जिल्ह्यात गत दोन महिन्यांत जिल्हा आरोग्य प्रयोग शाळेने केलेल्या अणुजीव पाणी तपासणीत तब्बल ५०४ नमुने दूषित आढळून आले आहेत.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सार्वजनिक विहिरी, कूपनलिका तसेच गावांना पाणीपुरवठा करणारे इतर जलस्त्रोतांमधील पाणी नमुन्यांची तपासणी जिल्हा प्रयोग शाळेत करण्यात येते. गत काही महिन्यांत दूषित पाण्याचे प्रमाण वाढत असल्याचे तपासणीवरून स्पष्ट होते. आॅक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचा आढावा घेतल्यास दोन महिन्यात अनुक्रमे ३१७ व १८७ पाणी नमुने दूषित आढळून आले. यात कोलीफॉर्म जंतूचे प्रमाण आढळून येते. दूषित पाण्यामुळे साथरोग वाढण्याचे प्रमाण वाढले आहे. जिल्हा प्रयोग शाळेतील अणुजीव व रासायनिक दोन प्रक्रियेद्वारा पाणी तपासणी होते. यात अुणजीव तपासणीत दूषित पाणी आढळून आले. ब्लिचिंग पावडरचा योग्य वापर केल्यानंतर तसेच पुन्हा तपासणी केल्यानंतर पाणी वापरावे, असे आवाहन प्रयोगशाळेच्या वतीने करण्यात येते. सार्वजनिक विहिरी व कूपनलिकांच्या भागात अस्वच्छता तसेच ब्लिचिंंग पावडर न वापरल्याने जलसाठे दूषित होतात.