५०० रूपयांची लाच घेणारा तलाठी जेरबंद
By Admin | Updated: February 4, 2015 00:40 IST2015-02-04T00:38:02+5:302015-02-04T00:40:36+5:30
भूम : शेतजमिनीची खातेफोड करून तसा फेरफार मंजूर करून तसा सातबारा देण्यासाठी ५०० रूपयांची लाच घेणाऱ्या चिंचपूर सज्जाचे तलाठी हनुमंत भीमराव देडे

५०० रूपयांची लाच घेणारा तलाठी जेरबंद
भूम : शेतजमिनीची खातेफोड करून तसा फेरफार मंजूर करून तसा सातबारा देण्यासाठी ५०० रूपयांची लाच घेणाऱ्या चिंचपूर सज्जाचे तलाठी हनुमंत भीमराव देडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने जेरबंद केले़ ही कारवाई मंगळवारी दुपारी भूम शहरात करण्यात आली़
चिंचपूर ढगे येथील शेतकऱ्याने स्वत:च्या नावावर असलेल्या साडेदहा एकर जमिनीतील अडीच एकर शेती स्वत:च्या नावे व चार एकर शेती आईच्या नावाने अशी खातेफोड करून देण्याची मागणी तलाठी हनुमंत भीमराव देडे यांच्याकडे रितसर अर्ज देवून केली होती़ त्यावेळी तलाठी देडे यांनी शेतजमिनीची खातेफोड करून तसा फेरफार मंजूर करून तसा सातबारा देण्यासाठी ५००० रूपयांची मागणी केली़ त्यानुसार तक्रारदार शेतकऱ्याने आर्थिक परिस्थिती नसतानाही ४५०० रूपये तलाठी देडे यांना दिले होते़ त्यानंतर पंधरा दिवसांनी तक्रारदाराने देडे यांच्याकडे कामाबाबत विचारणा केली असता उरलेले ५०० रूपये आणून दे, त्याशिवाय खातेफोड करून तसा उतारा देणार नाही, असे सांगितले़ त्यानंतर तक्रारदाराने उस्मानाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रितसर तक्रार केली़ या तक्रारीनंतर पोलीस अधीक्षक डॉ़ डी़एस़स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक नेकलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक अश्विनी भोसले व त्यांचे सहकारी पोनि आसिफ शेख, सपोफौ दिलीप भगत, पोना सुधीर डोरले, नितीन सुरवसे, बालाजी तोडकर, पोकॉ सचिन मोरे, चालक राजाराम चिखलीकर यांनी भूम येथे सापळा रचला़ त्यावेळी तलाठी देडे यांनी तक्रारदाराच्या कामासाठी ५०० रूपये लाचेची मागणी करून ती स्विकारल्यानंतर कारवाई केली. भूम ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. (वार्ताहर)